!!जय शिवराय !! जय भिमराय !!

 *!! शिवराय ते भिमराय !!*

--------------------------------

*ज्यांच्या आयुष्याची सुरूवात आणि शेवट संघर्षाने झाला त्यांच्या कार्याने सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले,न्याय व हक्कांसाठी लढणं आणि शुन्यातुन घडण हे जनसामान्यांना ज्यांच्या प्रेरणेतुन मिळालं, जातीव्यवस्थेच्या अयायकारक भिंतींना भेदून सामान्यांच्या आयुष्यामध्ये विकासाचे किरण ज्यांच्या कार्यामुळे आले ते आपले सदोदित आदर्श युगपुरूष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आनन्यसाधारण कार्याविषयी आजचा हा संयुक्तिक लेख ...!*

                         🙏🙏🙏🙏🙏🙏


    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे भारतरत्न विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्यांनी लिखित केलेल्या संविधानावर आपला संपुर्ण भारत देश चालतो आणि हेच विचार त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेले श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र यांच मोल शब्दांत करणं शक्य नाही.एक युगपुरूष असा ज्याने तलवारीच्या आणि शिवनीतिच्या धारेने शत्रुला नामोहरण केले व सामान्य जनतेसाठी रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले आणि याच युगपुरूषाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जो लेखणीच्या धारेने हक्कांसाठी शिकला - टिकला, लढला व घडला आणि हे दोही युगपुरूष म्हणजे श्री.शिवराय व भिमराय . दोघेही प्रसंगानुसार लढले पण,ते स्वता:साठी कमी व सामान्यांसाठीच अधिक एकीकडे पाहिलं तर श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमावस्येच्या रात्री शुभाशुभ, मुहुर्त न पाहता अनेक लढाया लढल्या व जिंकल्या आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सलग आठरा - आठरा तास आभ्यास करून लेखणीच्या सामर्थ्याच्या जोरावर अन्यायाविरूध्दच्या सर्व लढाया जिंकल्या, म्हणजे प्रतिकूलतेला यांनी संधी कसं बनवलं आणि त्या प्रतिकुलतेच रूपांतर अनुकूलतेत कसं केलं याचा प्रत्यय आपल्याला येईल.

जी कधी जातच नाही 

ती म्हणजे जात आणि याच जातीसाठी माती खाणारे आणि बहुजनांमध्ये फुट पाडून,जाती,वर्ण व्यवस्थेला खतपाणी घालणारे त्यातुन त्यांना निर्माण होणाऱ्या पोषक वातावरणामुळे आपल्या पोळ्या भाजुन घेणारे धर्मांध आणि कर्मठांची त्या काळी कमी नव्हती. युगानुयुगे चालत आलेल्या या अनिष्ठ प्रथेचा फायदा उचलणारे जात्यांध लोक या शिव - शाहू -फुले - आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यामुळे नमले, शमले.छत्रपती श्री.राजर्षी शाहू महाराज यांचे जातिव्यवस्थेविरोधी कार्य आणि त्यांचा इतिहास वाखाणण्याजोगा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे महात्मा फुले यांनी बहुजनांची अज्ञान ही कमजोरी लक्षात घेऊन समाजाला उन्नतीच्या दिशेने यायचे असेल तर प्रथम स्त्री शिकली पाहिजे असे त्यांना वाटले आणि त्यातुाच त्यांनी पुण्यामध्ये स्त्री शिक्षणाची गरज लक्षात घेऊन पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्यांनी बहुजनांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था घरच्या हौदामध्ये करून जातीव्यवस्थेला शह देण्याचे मोलाचे कार्य केले तेच हे जनसामान्यांच्या जीवनातले खरेखरे महात्मा. महात्मा म्हणायचं  तर यांना म्हणावे.महात्मा होणं हे काही ऐऱ्यागैऱ्याचं काम नव्हे.उगाच मला महात्मा म्हणा म्हणून महात्मा उपाधी लावुन घेणाऱ्यांना काय महात्मा म्हणता ? आणि  हेच ते महात्मा फुले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम शिवजयंती साजरी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक पत्र लिहिताना एकही पत्र शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण केले नाही हे तरी आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे. ?

ज्यांचं कार्य अनमोल, ज्यांचा मार्ग सत्याचा अवघड, ज्यांचा त्याग घनघोर.तेच युगपुरूष आणि महात्मा होऊ शकतात याचा विसर न पडू देणं, त्यांच्या कार्याचा जागर करत राहणं, त्यांचे विचार आत्मसात करून आचारात आणनं अन्यायाविरोधात बंड करून न्यायासाठी लढणं, प्रतिकुलतेचं रूपांतर संधीमध्ये करून यश प्राप्त करणं, स्त्री शक्तीचा सन्मान करणं हीच तर खरी या शिव - शाहू - फुले - आंबेडकर या चतु:सुत्रीची जयंती...! यांची जयंती म्हणजे यापेक्षा वेगळं असेलच काय ? तुम्ही - आम्ही साजरी करत असलेली जयंती ही तर केवळ माासिकताच मात्र या जयंती करवी जो बदल मला सुचवावा वाटतो तो एवढाच 

आपले वंदनिय आदर्श हे युगपुरूष प्रतिकुलतेमुळं न थांबता संघर्ष करत राहिले कधी न अडले नेहमी लढले आणि म्हणूनच घडले.

आजच्या या क्षणी गरज क्रांतीची असुन उत्क्रांतीची आहे. त्यामुळे धार तलवारीला नव्हे तर लेखणीला लावुन उत्क्रांतीच्या लढ्यासाठी एकविसाव्या शतकातील प्रत्येक युवकाने सज्ज व्हावं असं मला वाटतं. “शिका-संघटित व्हा आणि संघर्ष करा" या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनं.अन्याय आणि जुलूम याविरूध्द बंड करून उठणं या फुले शाहुंच्या प्रेरणेनं, शुन्यातुन स्वराज्य उभारण्याच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फुर्तीनंं प्रेरित होऊन देशाचे माजी राष्ट्रपती आपले आदर्श डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी, दंगलमुक्त महाराष्ट्र, आत्महत्या मुक्त शेतकरी, व्यसनमुक्त तरूण तसेच ज्ञानवंत आणि धनवंत समाजनिर्माणासाठी  आजच्या युवकांनो तुम्ही सज्ज व्हा,असं केलात तर,


“होईल अमर तुमचं नांव

आणि त्या नावासह गाव

करा विचार क्षणभर

मागणी तुम्हा जगभर !

करूनी उज्वल विचार,

लावूनी लेखणीस धार,

व्हा कार्यास स्वार,

हेच तर, 

शाहू-फुले-आंबेडकरांचे 

शिवसार !"


 !जय शिवराय! जय भिमराय!........ धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण