केळी आरोग्यासाठी उपयुक्त ....१५ एप्रिल जागतिक केळे दिवस....

 *आज १५ एप्रिल* 🙏🙏🙏🙏

*आज जगभरात जागतिक केळे दिवस (वर्ल्ड बनाना डे) साजरा केला जात आहे*

मंडळी, घरी केळी नसतील तर घेऊन या व आज भरपूर केळी खा. तसेच घरातील लहानग्यांनाही भरपूर केळी खायला द्या. आणि कोणाचा उपास असेल तर काहीच चिंता नाही केळी म्हणजे फळंच तर उपासाला चालतातच. जागतिक पातळीवर दरवर्षी आजचा दिवस केळे दिवस म्हणून साजरा केला जातो. निसर्गतःच केळ्यात अशी द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे मानसिक ताण, चिंता (Anxiety) कमी होण्यास खूप मदत होते. यामुळेच पूर्वीचे लोक परीक्षा किंवा मुलाखतीला (इंटरव्ह्यू) जाताना केळं अवश्य खात असत. केळ्याची शिकरण हा तर पूर्वी आपल्याकडे गोडधोडाचा पदार्थ मानला जायचा. कवीवर्य गदिमांचे गाणे आठवते? मामाची बायको सुगरण! रोज रोज पोळी शिकरण. मंडळी, शिकरण हा अस्सल मराठमोळा पदार्थ. आपणही आज केळ्याची शिकरण जरूर खा. आज केळ्यांचा भरपूर आनंद घ्या व लहानग्यांनाही मनसोक्त केळी खाऊ द्या. मुलांना तर शिकरण खूप आवडते. पोटभर खाऊ द्या त्यांना. केळे हे फळ १२ही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. तसेच कॆळं हे सर्वांना आवडणारे फळ आहे. कदाचित हत्तींचे सर्वात आवडतं फळ कॆळं असावे म्हणून गणपती बाप्पालाही कॆळं फार प्रिय आहे असे असेल. तसेच उपासकर्मी पण उपासाला इतर कोणते नाही तरी कॆळं आवर्जून सेवन करतात. केळी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. केळ्यात जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) भरपूर विशेषतः नत्र (पोटॅशियम) भरपूर प्रमाणात असतात. या शिवाय केळ्यात शरीरासाठी इतरही अतिशय गुणकारी अशी अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात समाविष्ट केल्याने फायदेच होतात. दररोज केळं खाल्याने हृदयविकार झटक्याची (हार्ट अॅटॅक) शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या शिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. काही लोक अति पिकलेली काळी झालेली केळी नको म्हणून सरळ टाकून देतात पण या केळ्यांचेही अनेक फायदे आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक कृषी आर्थिक विकास निधी (यूनायटेड नेशन्स इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट) या संस्थेने अति पिकून संपूर्ण साल काळं पडलेल्या केळ्याचे महत्त्व व त्याचे फायदे सांगितले आहेत. आता हे युनो संस्थेने सांगितले आहे तर मग आपल्याकडचे नास्तिक व तथाकथित पुरोगामी केळी मुद्दाम काळी करूनच खातील असे हे दिवटे लोक आहेत. आपल्याकडील ऋषी महंतांनी कितीही कानीकपाळी ओरडून सांगितले तरी पटणार नाही अशी आपल्या भारतीयांची गत झाली आहे. असो. तर अशा काळ्या केळ्यात ट्रिप्टोफैन नावाचे द्रव्य मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे मानसिक ताण, चिंता (Anxiety) कमी होण्यास खूप मदत होते. त्यामुळे अशा केळ्याचा वापर पाव (ब्रेड) बनवण्यासाठी तसेच शिकरणी सारखा पदार्थ किंवा मिल्कशेक बनवण्यासाठी केला जातो. केळ्याचा रंग जस-जसा काळा पडत जातो, तसतसे केळं अधिक, अति पिकलं जातं असं केळं अनेक जण खराब झालं म्हणून किंवा काळं व अतिशय मऊ झालं म्हणून खायला आवडतं नसल्याचं सांगतात. परंतु अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं. कृपया यापुढे अशी केळी टाकू नका. असे केळे खाण्याने अनेक आजारांपासून मुक्त होण्यास मदत होते. रंगाच्या आधारे केळं पिकलेलं वा कच्चं आहे याचा अंदाज लावता येतो. केळ्याचा रंग जर हिरवा असेल तर ते कच्चं केळं म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे कच्च्या केळ्यांची भाजी करतात. ही भाजी खूप चविष्ट व गुणकारी असते. नंतर केळ्याचा रंग पिवळा होत जातो. केळं अधिक पिकत गेलं की त्यावर काळे डाग पडायला सुरूवात होते. त्यानंतर काही दिवसांत केळ्याचं संपूर्ण सालचं काळं पडत. हिरवी साले असलेली केळी जरूर खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण घटायला म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हे केळं हळू-हळू पचतं. त्यामुळे रक्तातील साखर (ब्लड ग्लूकोज) कमी प्रमाणात निर्माण होतं. पिकलेलं केळं अॅन्टी-ऑक्सिडेंट म्हणून मानलं जातं. हे केळं चयापचन (मेटबॉलिजम) क्रियेला ताकद देण्यात मदत करते. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता खूपच कमी होते. हे केळं सहज पचतं. अति पिकलेल्या केळ्याचा वापर नाश्त्यात करणे अतिशय आरोग्यदायी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारही (डॉक्टर) सकाळच्या नाश्त्यात केळं खाणं गुणकारी असल्याचा सल्ला देतात. केळ्याचा वापर सौदर्यासाठीही केला जातो. स्त्रियांनी आपलं सौंदर्य व कमनीय बांधा टिकवायचा असेल तर रोज एक केळ खावे. बाळंतीणीला केळं गरम करून द्यावे किंवा केळेपाक द्यावा म्हणजे जास्त दूध सुटायला मदत होते. केळ्याचा अंश दुधाद्वारे बाळाला गेला तर बाळाला झोप छान लागते व काही दिवसातच बाळ गुटगुटीत होते. केळं खूप शक्तिवर्धक आहे. पहिलवान रोज न चुकता केळी खातात. दररोज केळी खाखाल्याने एनिमियाचा धोका टळतो. केळं खाल्याने आपले मानसिक आरोग्यही (मूड) चांगले राहते. थकवा दूर होतो. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात. केरळात केळ्याचे वेफर्स मोठ्या प्रमाणावर केले जातात. याला देशी विदेशी प्रचंड मागणी असते. त्वरीत वजन वाढण्यास केळ्याने मदत होते त्यामुळे काही लोकांना कमी वजनामुळे एखादी नोकरी गमवावी लागते अशी भीती वाटत असेल तर वैद्यकीय परीक्षेपूर्वी (मेडिकल टेस्ट) भरपूर केळी खावीत. केळ्याची सालेही औषधी असतात. त्यामुळे साल खाल्ले तरी काही बिघडत नाही. पण केळं खाऊन साल जमिनीवर टाकू नये त्यावरून इतर कोणी घसरू शकते.

*जागतिक केळे दिवस (वर्ल्ड बनाना डे).....धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण