संजय गांधी निराधार योजना.....
संजय गांधी निराधार अनुदान योजना
क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
संजय गांधी निराधार अनुदान योजना
या योजनेसाठी लाभार्थी खालीलप्रमाणे
या योजनेसाठी 60 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला ( ज्यांना मुल बाळ सांभाळणारे नाही असे ), निराधार महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), विधवा महिला ज्यांची मुले 18 वर्षा खालील पाहिजे ,घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, असे अनेक नियम ह्या योजनेत समाविष्ट आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयात संपर्क करून माहिती घेवू शकता ,जर तलाठी activ असेल ,सरपंच activ असेल तर नियमात जर एखादी व्यक्ती बसत असेल तर तत्काळ त्याचे काम होऊन जाईल..
संजय गांधी निराधार योजना व त्याचे फायदे:
या योजनेला पात्र होणा-या लाभार्थ्यास प्रती महिना रुपये 1000- इतके मानधन मिळणार हे मानधन पूर्वी फक्त रुपये 600 इतकेच होते त्यात नव्याने सुधारणा करण्यात आली आहे . महागाई पाहता शासनाने हा निर्णय घेतला आहे असे वाटते ..
अर्जदाराने म्हणजेच लाभार्थ्यांनी अर्ज कसा करावा..
1 अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय
2 तहसलिदार संजय गांधी योजना
3 तलाठी कार्यालय
ह्या साठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे
1 फोटो
2 बँक पासबुक
3 रेशनकार्ड
4 उत्पन्नाच्या दाखला
5 आधार कार्ड
ही सर्व कागदपत्रे घेवून संबंधित अधिकारी यांची भेट घ्यावी..
ह्या पैकी तुम्हाला काही नाही जमले तरी चालेल ,तुम्ही सरपंच अथवा तलाठी ह्यांची भेट घेवून करू शकता ,नाहीतर एजंट लोक असतातच सगळीकडे शासकीय कामे करायला ...
अधिक माहितीसाठी शासकीय वेबसाईटला भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
हे सर्व योजना जिल्हा अधिकारी ह्यांच्या
नियंत्रणाखाली
आहेत ... ......धन्यवाद
Comments
Post a Comment