अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

अपंग / दिव्यांग घरकुल योजना - त्याची माहिती 

दिव्यांगांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना घरकुल मिळावे म्हणून शासनाकडे विविध संगठना मागणी करत असतात त्यामुळे शासनाने अर्थसंकल्प 2023 मध्ये 100 कोटींची तरतूद अपंगांसाठी केली आहे .

राज्यात जवळ जवळ 30 लाख अपंग असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांसाठी 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरकुल मिळावे अशी मागणी देखील केली ...

अपंग घरकुल योजना महाराष्ट्र राज्य 

ही योजना राज्य  सरकार ची योजना आहे

दिव्यांग योजना  चा उद्देश

दिव्यांग मागासवर्गीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे.

कधी सुरु झाली 27 फेब्रुवारी 2019

                   

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात जो कोणी अपंग असेल व त्याच्याकडे 40 टक्के अपंग असलेला ऑनलाईन दाखला असेल तर त्याने ग्रामपंचायत मध्ये जावून आपला घरकुल चा फॉर्म भरून आपली कागदपत्रे तेथे जमा करावी ती कागदपत्रे ग्रामसेवक अथवा सरपंच तत्काळ मंजुरीसाठी पंचायत समितीला पाठवून देतात .दर  वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना मंजुरी देण्यात येत असते .ज्या लाभार्थ्यांना पक्के घर नाही अशा लाभार्थीने लवकरात लवकर कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात  जमा करावीत.

ग्रामपंचायत कार्यालयात जर आपले निवडून दिलेले सदस्य अथवा सरपंच ॲक्टिव असतील तर आपली कामे लवकर होतात ...आणि दिव्यांग असल्यावर लवकरात लवकर होतात फक्त आपल्याकडे सर्व कागदपत्रे आवश्यक आहे .

ह्या योजनेसाठी जर कोणी पैसे मागत असेल तर आपण प्रहार संघटना यांच्याकडे देखील तक्रार करू शकता .

प्रहार संघटना ही दिव्यांगांसाठी खूप आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते 

अपंग यशवंत घरकुल महाराष्ट्र योजना  साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे 

1  उत्पन्न दाखला

2  जागा स्वतःच्या नावे असावी

3  पक्के घर नसावे

4  अपंग प्रमाणपत्र, 40टक्के पेक्षा जास्त 

5  आधार कार्ड,

6  ग्रामपंचायत ठराव विहित नमुन्यातील अर्ज 

7  7/12 , 8 अ


40% पेक्षा जास्‍त दिव्यांग असलेल्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्र जोडावे.

त्यांचे बँकेतील खात्याचा पुरावा दर्शविणारे खाते पुस्तकाची प्रत, बँकेचे नाव, पत्ता खाते क्रमांक व आयएफएससी कोड इत्यादी बाबींचा उल्लेख असावा.

अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा....धन्यवाद 





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna