सुकन्या समृद्धी योजना - बेटी बचाव बेटी पढाओ

सुकन्या समृद्धी योजना व त्याची उद्दिष्टे.

मुलींचे भविष्य पाहता सरकारने सुकन्या समृद्धी योजना अमलात आणली ,कारण ह्या 10 वर्षाच्या आतल्या कालखंडात स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण खूप वाढले होते ,मुलगी जन्माला आली की पालकांना ती खूप मोठी जबाबदारी वाटते त्यामुळे समाजात मुलीचे प्रमाण खूप कमी होत चालले होते ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रूण हत्या होवू नये म्हणून सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची स्थापना केली....

 सुकन्या समृद्धी योजना काय आहे व त्याचे काय फायदे आहेत ह्याची आपण  सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारत सरकार अश्या अनेक योजना चालवत आहे ज्याद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामधील अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. 

सुकन्या समृद्धि  योजनेची उद्दिष्ट्ये..


भारताचे लाडके पंतप्रधान यांनी सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे उज्वल भवितव्य व्हावे यासाठी २२ जानेवारी २०१५ रोजी ह्या योजनेची  स्थापना केली ..  या योजनेंतर्गत पालकांनी आपल्या मुलीचे  बचत खाते  राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात उघडले पाहिजे . ज्या  पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि किंवा लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत. ते या योजनेत बचत खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी किमान रक्कम २५०/- रुपये तरी खात्यात जमा पाहिजे  आणि कमाल रक्कम १,५०,०००/- रुपये पाहिजे . यापूर्वी सुकन्या समृद्धि योजनेसाठी सरकारने २०२१ अंतर्गत ९.१ टक्के व्याजदर ठेवला होता तो आता कमी करून ८.६ टक्के करण्यात आला आहे......


डिजिटल सुकन्या समृद्धि योजना 2022 –

भारतीय पोस्ट ऑफिस संचलित सुकन्या समृध्दी योजना भारत सरकारने मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू केली. या योजनेंतर्गत पैशांची भरपाई करण्यासाठी पोस्ट ऑफिसला जावे लागते. परंतु आता भारतीय पोस्ट ऑफिसने डिजिटल खाते सुरू केले आहे. या डिजिटल खात्यातून सुकन्या समृद्धि योजनेच्या खात्यात पैसे जमा केले जातील. आता इतर बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल सेव्हिंग अकाऊंट सेवा सुरू केली गेली आहे. या डिजिटल खात्यामुळे आता खातेदारांना खात्यात पैसे जमा करण्यासाठी टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. तो आपल्या मोबाइलद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार किंवा ह्या योजनेनुसार मुलींचे उज्वल भवितव्य घडावे ,मुलींचे भविष्यात शिक्षणासाठी अथवा मुलींच्या लग्नासाठी त्यांच्या आई वडिलांना कोणताच आर्थिक त्रास होवू नये व मुलींचे स्त्रीभ्रूण हत्या रोखली जावी हा महत्त्वाचा उद्देश सरकारचा आहे...

प्व्अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ

सुकन्या समृद्धी योजनेत कुटुंबातील किती मुलींना लाभ मिळू शकतो व तो कसा ते खालीलप्रमाणे.

ह्या योजनेनुसार कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकतो .जर एखाद्या कुटुंबात 3 अथवा 5 मुली आहेत तरी सुधा फक्त 2 मुलींनाच हा लाभ मिळू शकतो...

परंतु जर एखाद्या कुटुंबात जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल म्हणजेच त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील.

जुळ्या मुलींची गणना समान असेल, परंतु त्यांना स्वतंत्रपणे लाभ देण्यात येतील.

या योजनेंतर्गत १० वर्षाखालील मुलींचे खाते उघडले जाऊ शकते.


दर वर्षी किती आणि किती काळ पैसे द्यावे लागतील ?

ह्या योजनेत 250 रुपयांपासून ते 1,50000 पर्यंत रक्कम भरू शकता ..

सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात सुकन्या समृद्धी खात्यात किमान २५०/- रुपये जमा केले नाहीत तर ते डिफॉल्ट खाते मानले जाते. १२३ डिसेंबर २०१९ रोजी सरकारने अधिसूचित केलेल्या नवीन नियमानुसार आता या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या डीफॉल्ट खात्यात जमा केलेल्या रकमेवर समान व्याज दर देण्यात येईल.त्याबरोबरच सुकन्या समृद्धि योजना खात्यावर ८.७% आणि पोस्ट ऑफिस बचत – खात्यास ४% व्याज मिळेल.

सुकन्या समृध्दी योजनेत जमा न केल्यास काय होईल?

जर काही कारणास्तव खातेदार सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत रक्कम जमा करण्यास सक्षम नसेल तर त्याला वर्षाकाठी ५०/- रुपये दंड भरावा लागेल. आणि यासह, दरवर्षी किमान रक्कम भरावी लागेल. जर दंड भरला नाही तर सुकन्या समृध्दी योजना खात्यात बचत खात्याइतके व्याज दर मिळेल, जो ४ टक्के आहे.


                 

सुकन्या समृध्दी योजना 2022ची प्रमुख वैशिष्ठ्ये –

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण व लग्नासाठी सुकन्या समृध्दी योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून मुलीचे भविष्य सुरक्षित केले जाऊ शकते. या योजनेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.



मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सुकन्या समृद्धि योजनेतून ५०% रक्कम काढता येईल.

कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत १० वर्षाखालील मुलीचे खाते उघडले जाऊ शकते 

यमुक्र्स्अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ

सुकन्या समृध्दी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे 

1  मुलींचे  फोटो

2  मुलगीचे जन्म दाखला 

3  रहिवासी दाखला 

4  पॅन कार्ड

5  रेशन कार्ड

6  ड्रायव्हिंग लायसन्स

7 आधार कार्ड 

 अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या ....धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna