श्री स्वामी समर्थ महाराज स्तोत्र

!ओम नमोजी श्री गुरूनाथा !भक्त वत्सल समर्था ! तव पदी ठेवुनी माथा ! स्तवितो ताता तुजलागी !१! तू नित्य निरंजन ! तुज म्हणती निर्गुण ! तूच जगाचे कारण ! अहंभावे प्रगटलासी!२! तुझी स्तुती करावया ! शक्ती नसे हरिहर ब्रम्हा ! परी अघटीत तुझी माया ! जी संशयभया निवारीत!३! मूळ मुळीचा आकारू ! तुज म्हणती श्रीगुरु ! सच्चीत शक्तीचा आधारु पुर्णाधारू ओमकारासी!४! ऐसा तू देवाधिदेव ! हे विश्व तुझेची लाघव ! इच्छेचे वैभव ! मूळब्रम्ही नटविल !५! ऐसा तू बा अपरंपारू! या  अनंत ब्रम्हाचा आधारु ! चराचरीचा आकारू ! पूर्णाधारू म्हणविले!६! ऐशा तुजप्रती ! स्तवावया अल्प माझी मती !तू जाणसी हे चित्ती ! विश्वव्यापक म्हणवूनी!७! तरी देवा मतिदान !देणे तुजचि कारण ! जरी करणे समाधान !तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले !८! अहा जी निर्गुना! विश्वव्यापक सगुणा! सत्य निराकार निरंजना! भक्तांकरणे प्रगटलासि!९! रूप पाहता मनोहर ! मूर्ती केवळ दिगंबर ! कोटी मदनतेज निर्धार ! ज्याच्या स्वरुपी नटले!१०! कर्ण कुंडलाकृती !वदन पाहता सुहास्य मूर्ती ! भ्रुकुटी पाहता मना वेधती! भक्त भाविकांचे!११! भोवयांचा  आकारू ! जेथे भुले धनुर्धरू! ऐसे रूप निर्धारु ! नाही नाही जगत्रयी!१२! सरळ दंड जानू प्रमाण ! आजानुबाहू कर जाणं ! जो भक्ता वरद पूर्ण ! ज्याचे स्मरणे भवनाश !१३! ऐसा तू परातपरू! परमहंस स्वरूप सदगुरू! मज दावूनी ब्रम्ह चराचरू! बोलुविला आधारु जगतासी !१४! ऐशा तुज स्तवूनी ! मौन्य पावले सहस्त्रफनी ! वेद श्वान होवूनी ! सदा द्वारी तिष्टती !१५! तेथे मी लडिवाळ ! खरे जाणिजे तुझे बाळ! म्हणवोनी  पुरवी माझी आळ ! माय कनवाळ म्हणविसी !१६! मी अन्यायी नाना परी ! कर्मे केली दुर्वीचारी ! ती क्षमा करोनी निर्धारी ! मज तारी गुरूराया !१७! मनाचिया वारे जे उठवी पापांचे फवारे ! तेणे भ्रे ने भ्रमलो बारे! चुकवी फेरे भवाचे !१८! कायिक वाचिक मानसिक ! सर्व पापे झाली जी अनेक ! ती क्षमा करुनी देख! मज तारी गुरूराया !१९! माता उदरी तुम्ही तारीले ! ते विस्मरण पडिले ! हे क्षमा करुनी वाहिले ! मज तारी गुरूराया !२०! पर उपकार विस्मरण पापे केली अघटीत कर्म ! अहंभाव क्रोधा लागून ! सदची गृही ठवियेले !२१! हे क्षमा करोनी दातारा ! मज तारावे लेकरा ! तुजविण आसरा नाही नाही जगत्रयी !२२! मन न घडे नेम धर्म ! नघडे उपासना कर्म ! नाही अंतरी प्रेम परी ब्रिदाकारण तारणे  !२३! नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ! ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे !२४! मागे बहुत तारिले हे त्यांही अनुभवले ! मज का अव्हेरीले निष्ठुर केले मन किनिमित्त !२५! तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचीले चराचरू!  तूची बीज आधारु व्यापक निर्धारु जगत्रयी !२६! चार देहांच्या सुक्ष्मी तुची झुलविशी नीज लगामी !  हे ठेवुनी कारणी अहंभाव तोडावया !२७ ! जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी ! ते सोडविशी जरी निजनामे करुनिया !२८! ऐसा तू अनादी आधारु तुज म्हणती वेदगुरू ! परी हे व्यापूनी अंतरू स्थिरचरी व्यपिले !२९! भावभक्ती चोखट करणे नेणे बिकट ! नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा ! ३०! हे जाणुनी अंतरी पिंड ब्रम्हांड शोधीले जरी ! तरी सुक्षमीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक !३१! म्हणोनी मौण्यगती तुज निजांनदी स्तविती ! जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा !३२! म्हणोनी स्तवन स्तवनी तुज सांगणे एक जनी ! वश व्हावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणोनिया !३३! अहंभाव तुटोनी गेला प्रेमभाव प्रगटला ! देव तेथेची राहिला अनुभवशुद्धी खेळवी !३४! यज्ञ कोटी करू जाता जे फळ न ये हाता ! ते प्रेमभावे स्तविता हरिते व्यथा भवाची !३५! म्हणोनी सांगणे खूण हा स्तव नित्य प्रेमे जाणं ! जो वाचील अनुप्रमाण अकरा वेळा  निर्धारि !३६! सुचिस्मित करुनी चीता जो जपे प्रेमभरीता ! पुरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा !३७! हे लघु स्तव स्तवन तारक जगाच्या कारण ! भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा !३८! जो हा स्तव  करिल पठण त्याघरी आनंद प्रगटेल जाण ! देवोनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील !३९! हा स्तव नित्य वाचा भाव धरुनी जीवाचा ! फेरा चूकवा चौरायंशीचा गर्भवास पुन्हा नाही ! ४०! हे जगा हितकारी चूकवी चुकवी भ्रमफेरी ! मृगजळ दावूनि संसारी मग तारी जिवाते !४१! हे आनंदनाथाची वाणी जग तारक निशाणी ! स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले !४२! ऐसे ऐकता गुरुस्तवन  जागे केले सच्चित गुरूकारण ! केवळ तो हरिहर ब्रम्ह मुख यंत्रीचा गोळा पूर्ण गुरू हृदय भुवन व्यापिले !४३! तेणे होवूनि स्मरती स्वये प्रगटली स्फूर्ती ! नाभी नाभी आवरती अवतार स्थिती बोलतो ! ४४! अयोनीसंभव अवतार हिमालय उत्तरभागी निर्धार ! होवुनी पूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचर निजलीले !४५! तेथून प्रकट भुवन मग उद्धरु धरा जाणं ! धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे !४६! ऐशी ध्वनी निर्धार गरजला गुरू दिगंबर ! सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रगटला !४७! शालिवाहन शके तीनशे चाळीस शुद्ध पूर्ण चैत्र मास ! अवतार घेतला द्वितीयेस वट छायेसी दिगंबरू ! ४८! तयं धरा आनंदली थोर मज दावा रूप सुकुमार ! सेवा करीन निर्धार पादकिंकरी होऊनिया !४९! ऐशी गर्जना प्रकट आनंद बोधवी हितार्थ ! गुह्य हे नीज बोधार्थ न बोलावे दांभिक ! ५० !   श्री स्वामी समर्था अर्पणमस्तू !!    टीप - आपला संकल्प पूर्ण होण्यासाठी दररोज अकरा वेळा एकवीस दिवस वाचन करावे ....धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण