अटल पेन्शन योजना - सरकारी पेन्शन योजना

 भारत सरकार अटल पेन्शन योजना

 महिन्याला  फक्त 210 रुपये जमा केल्यावर  मिळवा  60,000 रुपये पगार वर्षाला 


अटल पेन्शन योजनेत तुम्हाला कमीत कमी  20 वर्षे पैसे जमा करण्याचा  नियम आहे .व्यक्तीने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला  पेन्शन मिळू शकते 


अटल पेन्शन योजना

  प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही भारतात कमी कालावधीत प्रसिद्ध झालेली योजना आहे .  ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक बचत  करुन  उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च व तुम्हाला लागणारा खर्च भागविता येवू शकतो तुम्हाला कोणावरही अवलंबून रहायची गरज लागणार नाही . तुम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होवू शकता . लवकरात लवकर  या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर योजनेतंर्गत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. ही योजना सर्व सरकारी   बँक (Bank) अथवा पोस्ट कार्यालयातही (Post Office) उपलब्ध असून तुम्ही ऑफिस मध्ये जावून संपूर्ण माहिती घेवू शकता .. .  भविष्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात उत्तम व चांगला पर्याय ठरू शकतो. अटल पेन्शन योजनेत जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक केली तर व्यक्तीच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील सर्व साधारण नागरीक ,संघटित कामगार ,असंघटित कामगार,रोजंदारी कामगार ,व्यापारी ,दुकानदार ,शेतकरी वर्ग  मोठ्या प्रमाणात गुंतवणूक(Investment) करत आहे असे सरकारी नोंदीनुसार  दिसत आहे.  अटल पेन्शन योजनेसाठी देशातील कोणताही नागरिक आपल्या सरकारी बँकेत अर्ज करू शकतो.



 अटल पेन्शन योजनेत वयाची अट व नियम खालीलप्रमाणे.

अटल पेन्शन योजनेत व्यक्तीचे 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो व त्याचे बँकेत अथवा कोणत्याही सरकारी बँकेत त्याचे बचत खाते चालू असावे या योजनेत व्यक्तीला  कमीत कमी  20 वर्षे मासिक पैसे जमा करावा लागणार आहे. प्रत्येक महिन्यात किती पैसे भरायचे अथवा  द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.


भारत सरकार अटल पेन्शन योजनेचा लाभ व फायदे  खालीलप्रमाणे 

भारतात राहणारा किमान 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत बँकेच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतो. 

1  वयाच्या 18 व्या वर्षी, जास्तीत जास्त 5000 महिन्यांच्या        पेन्शन मर्यादेसाठी, त्याला दरमहा 210 रुपये द्यावे           लागतील.

2  वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376             रुपये.

3   30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये.

4   35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये .

5   39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये योगदान आहे. 

ह्या  योजनेचं लाभ घेण्यासाठी वयानुसार वेगवेगळे नियम आहेत 



 अटल पेन्शन योजनेत सहभाग घेण्यासाठी आयकर सूट

या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे ह्या योजनेत  गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना प्राप्तीकर खात्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळू शकते ह्याची माहिती सुधा तुम्हाला बँक अधिकारी देवू शकतो . ह्या योजनेत 1 हजार रुपयांपासून   जास्तीत जास्त 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.जर लाभार्थी अथवा  ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम  वारसदाराला देण्याचा नियम आहे . या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीतकमी  20 वर्षे तरी  गुंतवणूक करावीच लागेल.

अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शासकीय बँकेत जावून तुम्ही पूर्ण माहिती घेवू शकता....ह्या योजनेचा सर्व नागरिकांना फायदा होवू शकतो .......धन्यवाद ..

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna