पॉवर टिलर अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान power tiler yojna

 पॉवर टिलर अनुदान योजना 50 % अनुदान 

Power tiler yojna 

पॉवर टिलर साठी शेतकऱ्यांना मिळणार आता अनुदान

अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आता खालील प्रमाणे पाहूयात.

पॉवर टिलर अनुदान योजनेमुळे आता पावर टिलर एकदम कमी पैशात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा .

कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये पॉवर टिलर या ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ कसा घ्यायचा आहे त्याचे निकष काय आहे त्याचा लाभ व फायदा व आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती या लेखात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकरी अल्पभूधारक असला तरी त्याला आपल्या शेतीमध्ये पावर टिलर चा उपयोग करता येणार आहे व आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही मशागती करून आपला उदरनिर्वाह चालवता येणार आहे .

या योजनेमुळे शेतकरी हा स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे . या योजनेमुळे शेतकरी हा यांत्रिकीकरणात प्रोत्साहित करणे हा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे

पावर टिलर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कमीत कमी दहा गुंठे जमीन असणं गरजेचे आहे. 

लाभार्थ्याचे वय हे 18 वर्ष तरी असावी. एकावेळी कुटुंबातील एका सदस्याला लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 

खालील प्रमाणे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

मोबाईल नंबर

सातबारा उतारा

आठ अ उतारा

जातीचा दाखला असल्यास

अपंग प्रमाणपत्र असल्यास

एवढी कागदपत्रांची आवश्यकता आहे .

अर्ज केल्यानंतर आपली निवड कृषी विभागाकडून लॉटरी पद्धतीने केली जाते.

एकदा अर्ज भरल्यानंतर पाच वर्षात मध्ये आपली कधीही  निवड केली जाऊ शकते .

लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला मोबाईल वरती एसएमएस किंवा कृषी विभागाकडून त्याला त्याची माहिती भेटते.

पावर ट्रेलर ट्रॅक्टर साठी शेतकऱ्याला 80 ते 85 हजार रुपयांचे अनुदान मिळते.

एकदा पावर टिलर आपल्याला लॉटरी पद्धतीने मिळाला तर तो आपल्याला पाच वर्ष विकता येत नाही याची लाभार्थ्याने नोंद घ्यावी.

पावर टिलर चा अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या महा-ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र ला भेट देऊन सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने भरू शकता .

 अधिक माहितीसाठी आपल्या कृषी कार्यालयाला भेट द्या अथवा आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या.

धन्यवाद ...


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna