भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2023 Falbag yojna

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023

Fundkar Falbag yojna 

फळबाग लागवड योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याची माहिती ,त्यासाठी असणाऱ्या अटी ,शर्ती व त्यासाठी आवश्यक असणारी नियम व त्याची पात्रता याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 -23

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा शेती करत असताना आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी अथवा शेतीमालाला बाजार भाव मिळण्यासाठी नेहमी खूप प्रयत्न करत असतो परंतु सर्व शेतकीय धोरण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी हा नेहमी आर्थिक विवांचनेमध्ये असतो. शेतकऱ्याला जर शेतमालाला हमीभाव भेटला तर शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो हे धोरण लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अमलात आणली.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उत्पन्न घेऊ शकतो.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मध्ये सोळा प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावू शकतो त्याची माहिती व नियम आणि अनुदान खालील प्रमाणे आहेत .

फळपिके व तीन वर्षात मिळणारी अनुदान खालील प्रमाणे वर्गवारी केलेली आहे आहे.


1 आंबा [ 10×10] मी

65084

58484


2. आंबा कलम [ 5×5 ]मी

126144


3. पेरू [ 6×6 ]

73619


4. पेरू [ 3× 2 ]

223811


5. संत्रे [ 6 × 3 ]

119071


6. मोसंबी [ 6×6]

81383


7. लिंबू [ 6×6]

71411

69749


8. सीताफळ [ 5×5 ]

86762

74762


9. चिकू [ 10× 10]

62789


10. डाळिंब [ 5 × 3]

117615


11. काजू

65752

57352


12. आवळे

59061

51860


13. चिंच व जांभुळ

56054.

50654


14. अंजीर

111658


15. नारळ

92032


16. फणस

53519

50529

एवढी कलमे झाडांची नावे असून त्यांना दिलेले अनुदान व ती झाडे नियमानुसार आपल्या शेतात लावावी लागणार आहेत. त्याला अनुदान मिळणार आहे.

ही सगळी सोळा पिकांची कलमी पिके कृषी विद्यापीठाकडून समाविष्ट करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्याला भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून फळझाडांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांमध्ये सर्व अनुदान मिळणार आहे .

पहिल्या वर्षामध्ये 50 टक्के अनुदान मिळणार आहे .

दुसऱ्या वर्षामध्ये 30 टक्के अनुदान मिळणार आहे .

तर उरलेले 20 टक्के अनुदान हे तिसऱ्या वर्षांमध्ये मिळणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे भरावी.

अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्याची निवड लॉटरी पद्धतीने कृषी विभाग करत असते त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ,अपंग ,अथवा ओबीसी यांना प्रामुख्याने प्रथम स्थान देण्यात येते.

याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झालेली माहिती कृषी विभागातर्फे अथवा अर्जदाराच्या मोबाईल क्रमांक वरती एसएमएस द्वारे कळते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

सातबारा उतारा

आठ अ उतारा

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

मोबाईल नंबर

अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र असल्यास

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

उत्पन्नाचा दाखला

एवढ्या सर्व कागदपत्रांची अर्जदाराला आवश्यकता असते .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. 

कृषी विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी फळ पिकांची लागवड शेतामध्ये करावयाची आहे .

धन्यवाद .

अशा अनेक विविध सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंकवर अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna