कडबा कुट्टी अनुदान योजना 2023 kadba kutti machine anudan yojna शेतकऱ्यांना मिळणार 50%अनुदान
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना
kadba kutti machine anudan yojna 2023
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचे फायदे , लाभ त्याची पात्रता व आवश्यक लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत
नमस्कार मित्रांनो राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातील ही एक योजना म्हणजे कडबा कुट्टी अनुदान योजना आहे.
शेतकरी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करत असतात शेतीची मशागती व त्यांची कामे सोयीस्कर व्हावी म्हणून या योजनेची स्थापना झाली.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023
शेतकरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हैस ,शेळी त्यांचे पालन करत असतो शेतकऱ्याला शेतीसाठी शेण खताची खूप आवश्यकता असते. कडबा कुट्टी मुळे जनावरांचे खाद्य बारीक करून ति जनावरांना देता येते त्यामुळे कमी खाद्यामध्ये जनावरांचे पोषण करता येते व उरलेले खराब खाद्य बारीक करून ते शेतीसाठी खत म्हणून वापरता येते या कामासाठी कडबा कुट्टीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामूळे कडबा कुट्टी मशीन ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.
ज्या शेतकऱ्याकडे गुरे ढोरे , जनावरे आहेत त्त्यांना चारापाणी करताना व त्यांना चारा कापून घालताना शेतकऱ्याला अतोनात कष्ट करावे लागतात त्यामुळे कडबा कुट्टी मशीन चा वापर केला तर शेतकऱ्याला हे कष्ट करावी लागणार नाही हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कडबा कुट्टी मशीन चे दोन प्रकार आहेत ते खालील प्रमाणे
स्वयंचलित
मानवचलीत
मानवचलित यंत्र हे स्वस्त दरात आहे तर स्वयंचलित यंत्र हे थोडे महागडे आहे मानव मानवचलित यंत्रामुळे शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात तर स्वयंचलित यंत्रामुळे शेतकऱ्याला त्रास कमी होतो .
कडबा कुट्टी मशीन ची किंमत दहा हजार रुपयांपासून तर 50000 पर्यंत आहे या योजनेसाठी शेतकऱ्याला 50% एवढी अनुदान आहे.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
सातबारा उतारा
आठ अउतारा
जातीचे प्रमाणपत्र असल्यास
ओळखपत्र
मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला
अपंगत्व दाखला असल्यास
अर्ज करण्यासाठी एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .
सर्वसाधारण लाभार्थ्याला सोळा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते तर जातीचे प्रमाणपत्र अथवा अपंगत्व दाखला असल्यास त्या लाभार्थ्याला 20 हजार रुपयांचे अनुदान मिळते.
कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो हा अर्ज आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये अथवा आपले सेवा केंद्र मध्ये जाऊन महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावयाचा आहे .
कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपली निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते याची माहिती आपल्याला कृषी कार्यालय अथवा आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस आल्यावर ती आपल्याला कळते त्यानंतर आपण पुन्हा महाडीबीटी पोर्टल वर जाऊन आपल्या आवश्यक त्या कागदपत्रांची पुन्हा माहिती भरावी. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यालाच कडबा कुट्टी अनुदान मिळते याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालय इथे भेट द्यावी .
धन्यवाद
Comments
Post a Comment