पीएम किसान योजना नमो शेतकरी महा सन्मान योजना शेतकऱ्यांना मिळणार प्रती वर्षी 12000 हजार रुपये

 नमो शेतकरी महा सन्मान योजना 

Namo shetkari nidhi yojna 2023 

नमो शेतकरी महा सन्मान योजना 2023

महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली .

आपल्या राज्याच्या लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा केली .

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

नमो शेतकरी महा सन्मान योजना अगोदर केंद्र सरकारकडून पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना अमलात होती त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत होती या योजनेत भर घालून राज्य सरकारने नमो शेतकरी हा सन्मान योजना अमलात आणली व त्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने ठरवले .

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना या योजनेचे 6000 आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचे 6000 असे शेतकऱ्याला प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहेत.

नमो सन्मान निधी योजनेचा लाभ एक कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे यासाठी राज्य सरकार कडून 7 हजार कोटी इतका निधी प्रस्तावित केला आहे .

या योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होणार आहे .

या योजनेमुळे शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळणार असून त्याच्या अडी अडचणी सोडवण्यास मोठी मदत होणार आहे.

ह्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या त्रुटी शासन लवकर दूर करून शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ देणार आहे..

धन्यवाद ..



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna