महिलांना मिळणार आता गॅस कनेक्शन मोफत प्रधानमंत्री उज्वला योजना p m ujwala yojna
प्रधानमंत्री उज्वला योजना p m ujwala yojna
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभ उद्दिष्टे व फायदे
उज्वला योजनेचा लाभ कसा मिळू शकतो
प्रधानमंत्री उज्वला योजनेची माहिती खालील प्रमाणे
प्रधानमंत्री उज्वला योजनेची स्थापना केंद्र सरकारने 2016 रोजी केली आहे .
केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या कुमकुवत व दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या सर्व कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देणार आहे.
उज्वला योजनेच्या माध्यमातून आता सर्व दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने भोजन तयार करण्यासाठी महिलांना होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळणार आहे त्यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ह्या योजनेची स्थापना झाली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होणार आहे .
पारंपरिक पद्धतीमुळे महिला भोजन तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करत होत्या आता तो वापर टाळणे शक्य झाली आहे यामुळे वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल टाळण्यात मदत होणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून आता कुटुंब सुखी आणि समृद्ध होणार आहे .
या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या जवळजवळ पाच कोटी महिलांना घरगुती गॅस देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जो संकल्प केला आहे त्या संकल्पना च्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली आहे.
भारत देशामध्ये अनेक वर्षापासून घरोघरी पारंपरिक पद्धतीने भोजन तयार करण्यासाठी चुलीचा वापर करण्यात येतो त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिला वर्गांना धुराचा अतोनात त्रास सहन करावा लागतो त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या मुलाबाळांच्या आरोग्यावरती होताना दिसत आहे ह्या त्रासातून त्यांची मुक्तता करण्यासाठी केद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेची स्थापना केली .
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपल्या जवळच्या एलपीजी केंद्रावर जाऊन किंवा गॅस वितरक यांच्याकडे जाऊन एक अर्ज सादर करावयाचा आहे तो अर्ज त्यांना मोफत मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहे .
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
बीपीएल प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो
रेशनिंग कार्ड
ओळखपत्र
एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .
अर्जदाराची वयोमर्यादा ही अठरा वर्षाच्या पुढील पाहिजे .
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्याला गॅस कनेक्शन घेण्यासाठी 1600 रुपयांचे आर्थिक मदत सरकारकडून होणार आहे..
अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या गॅस
वितराकाकडे जाऊन प्रधानमंत्री उज्वला योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी.
धन्यवाद.
सर्व शासकीय योजना पाहण्यासाठी खालील
लिंकवर भेट द्या.
http://www.newsjunner.com
शासकीय योजना
अपंग घरकुल
सुकन्या योजना
विहीर अनुदान
अटल पेन्शन योजना
Comments
Post a Comment