प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना p m yojna
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लाभार्थ्याची वय पात्रता त्याच्या अटी व या योजनेचे सर्व निकष आपण या लेखात पाहणार आहोत.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने जीवन ज्योती विमा योजनेची स्थापना केली.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गरीब लोकांसाठी ज्यांचे हातावर पोट आहे त्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला आपल्या सरकारी बँकेमध्ये 330 रुपये भरून दोन लाख रुपये जीवन ज्योती विमा संरक्षण मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय 18 ते 55 इतकी असावे. जर जर लाभार्थ्याचा अपघाताने अथवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या वारसास जीवन ज्योती विमा संरक्षण म्हणून दोन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने बँकेत आपले जीवन ज्योती विमा पॉलिसी साठी फॉर्म भरून देणे गरजेचे आहे .
एकदा की फॉर्म भरला की प्रत्येक वर्षी आपोआप बँकेच्या माध्यमातून मे ते जून दरम्यान 330 रुपये हे लाभार्थ्याच्या खात्यातून विमा कंपनीला अदा करण्यात येतात त्यामुळे विमा कंपनीचा प्रीमियम भरण्यासाठी कुठेही जावं लागत नाही.
आपल्या भारत देशामध्ये सर्वसामान्य कुटुंबांचा खूप मोठा समावेश आहे. व कुटुंबातील असंख्य कुटुंब प्रमुख कष्ट करत असताना आपल्या भविष्याचा विचार करत नाही त्यामुळे जर त्या कर्त्या पुरुषाचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला खूप मोठे आर्थिक कष्ट सोसावी लागतात त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अमलात आणली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी नेमलेल्या वारसदाराला लाभार्थ्याच्या पश्चात रक्कम मिळणार आहे.
या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहे .
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
विमा योजनेचा फॉर्म
एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेची अधिक माहिती आपणास आवश्यक असल्यास आपण आपल्या जवळच्या शासकीय बँकेत जाऊन याची माहिती घेऊ शकता.
धन्यवाद.
Comments
Post a Comment