शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna 2023 राज्य सरकार देणार शेतकर्‍याला 10 शेळी व 1 बोकड फ्री मध्ये

 शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna 

महाराष्ट्र राज्य कृषी शेळी पालन योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये कृषी शेळी पालन योजनेची सविस्तर माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय निकष व त्याच्या अटी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे .

भारत देशातील शेतकरी हा पूर्णपणे शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी गाय पालन करतो त्याचबरोबर शेळीपालन देखील करत असतो शेळीच्या व गायीच्या दुधाच्या उत्पन्नामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याला गाय खरेदी करणे खूप अवघड असते कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर्सी गायची किंमत खूप वाढलेली आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये शेळी शेतकऱ्याची काय म्हणून ओळखले जाते.

शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी एक योजना म्हणजे कृषी शेळी पालन योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

कृषी शेळी पालन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्याला 10 शेळ्या एक बोकड असा वाटप करणार आहे.

शेतकऱ्यांनी अशा नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी नेहमीच तयार असायला पाहिजे

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अशा योजनेच लाभ घेतल्यानंतर खरोखरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.

कृषी शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्याचे निकष खालील प्रमाणे आहेत .

अल्पभूधारक

सुशिक्षित बेकार

अनुसूचित जाती जमाती

विधवा महिला

जातीचा दाखला

अपंगत्व असल्यास

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

असे निकष लावण्यात आलेले आहेत.

कृषी शेळीपालन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला उस्मानी बादी व संगमनेरी जातीचे शेळीचे गट वाटप करण्यात येणार आहे. या जातींमध्ये उच्च तापमानामध्ये तग धरण्याची व उत्तम स्वास्थ्य टिकून ठेवण्याची क्षमता आहे तसेच या जातीचे प्रजनन क्षमता सुद्धा खूप चांगली आहे म्हणून या शेळ्यांना जास्त आजार पण न

येता शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

शेळी चारा व्यवस्थापनाची व शेळी निवाऱ्याची व्यवस्था स्वतंत्रपणे शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने करावयाची आहे.

शेळीपालन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

आठ अ उतारा

जातीचे प्रमाणपत्र असल्यास

अपंग प्रमाणपत्र असल्यास

ग्रामपंचायत ठराव

मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला

एवढ्या कागदपत्रांची लाभार्थ्याला आवश्यकता असते.

शेळीपालन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अथवा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज सादर करू शकता .

कृषी शेळी पालन योजनेची माहिती आपण आपल्या पंचायत समिती कार्यालय अथवा आपल्या ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन याची संपूर्ण माहिती घ्यावी. जर ही योजना चालू असेल तर आपण ऑनलाइन ऑनलाइन पद्धतीने आपल्या महा इ सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्जभरू शकता . अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची संपूर्ण माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज आपण पंचायत समिती कार्यालय मध्ये जमा करू शकता.

कृषी शेळी पालन योजनेची लाभार्थी निवडीची प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने केली जाते जर त्यामध्ये लाभार्थ्याला लॉटरी लागली तर तशी माहिती त्याला कळविली जाते व त्यानंतर लाभार्थ्याला दहा शेळी व एक बोकड असे वाटप करण्यात येते याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला आवश्यक भेट द्यावी.

धन्यवाद.

अशा सरकारच्या वेगवेगळे योजना पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर अवश्य भेट द्यावी.

http://www.newsjunner.com



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण