पीएम किसान योजना सौर पंप योजना sour krushi pump yojna 2023 शेतकऱ्यांना मिळणार 95% अनुदान
सौर पंप योजना 2023
Sour krushi pump yojna 2023
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
नमस्कार
सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार
आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे, लाभ, फायदा ,अनुदान ,अटी ,लाभार्थ्याची पात्रता, त्याचे वय व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात सविस्तरपणे पाहणार आहोत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
शेतकरी हा आपल्या शेतामध्ये शेती करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .
त्यामध्ये प्रामुख्याने विजेचा तुटवडा हा नेहमीच शेतकऱ्याला भासत असतो त्यामुळे विजेच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोल पंपांचा वापर करावा लागतो या पंपांसाठी जे इंधन वापरले जाते मग डिझेल असो किंवा पेट्रोल असो त्याचा खूप खर्च वाढतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते . हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतीसाठी शेतकऱ्याला सौरपंपाचा पुरवठा मोफत करण्यासाठी सौर पंप कृषी योजनेची स्थापना केली..
या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्याला पंप खरेदीसाठी 95 टक्के एवढे अनुदान देत आहे लाभार्थ्यांनी केवळ पाच टक्के रक्कम अदा करून सौर पंप घ्यावयाचा आहे .
सौर पंप घेतल्यामुळे शेतकऱ्याला रात्री अप रात्री शेतात जाऊन पाणी भरण्याची गरज भासणार नाही व शेतीसाठी लागणारे डिझेल इंजिन असेल अथवा पेट्रोल इंजिन असेल यासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळता येणे शक्य होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला विजेचा तुटवडा जरी भासला तर तो तुटवडा सौर पंपामुळे दूर होणार आहे त्यामुळे शेतकरी त्याचे शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकणार आहे व स्वतःची आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी शेतकऱ्याला खूप मोठी मदत होणार आहे.
सौर कृषी पंप योजनेची पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे .
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा तसेच पारंपारिक विज जोडणी असणाऱ्या शेतकऱ्याला अथवा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.
पारंपारिक पद्धतीने पाण्याचे स्त्रोत वापरणारी शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे त्या श्रोतामध्ये नदी असेल शेततळे असेल किंवा सार्वजनिक विहीर असेल इत्यादी स्त्रोत या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला
सातबारा उतारा
आठ अ उतारा
जातीचे प्रमाणपत्र असल्यास
अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास
सौर पंप कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .
या योजनेसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो
त्यासाठी आपल्याला जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सेवा केंद्र ला भेट द्यावी व महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रे जमा करावी त्यानंतर लाभार्थ्याला कृषी कार्यालयातर्फे अथवा आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे लॉटरी पद्धतीने झालेल्या निवडीची माहिती मिळेल. त्यानंतर लाभार्थ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
सौर पंप कृषी योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक शेतकरी आर्थिक दृष्ट्या सुखी व समृद्ध व्हावे व शेतकरी स्वावलंबि व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या कृषी कार्यालयाला भेट द्यावी.
धन्यवाद ....
Comments
Post a Comment