पीएम किसान योजना ठिबक सिंचन अनुदान योजना thibak sinchan anudan yojna सरकार देणार 80% अनुदान

 

ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 

Thibak sinchan anudan yojna

केंद्र सरकार देणार आहे 80 टक्के अनुदान

ठिबक सिंचन अनुदान योजना 80 टक्के अनुदान


प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान योजनेचा लाभ, पात्रता वय व फायदे याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी कसा घ्यायचा त्याची पात्रता काय पाहिजे अर्ज कोठे करायचा व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

ठिबक सिंचन अनुदान योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

ठिबक सिंचन अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना आता कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार आहे.

निसर्गाची अनियमितता त्यामुळे पर्जन्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्याला शेती पिकवणे जिकरीचे झाले आहे म्हणून केंद्र सरकारने ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी 80 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल . त्यामुळे शेतकरी सुखी व समृद्ध होऊ शकतो हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . 

ठिबक सिंचनामुळे पाण्याचा गैरवापर पूर्णपणे टळणार आहे त्यामुळे योग्य त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. 

ठिबक सिंचन मुळे शेतकऱ्याला रात्री आप रात्री पाणी भरण्यासाठी कुठलीही कसरत करण्याची गरज लागणार नाही.

 ठिबक सिंचना साठी  महाराष्ट्र राज्य हा इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली यावे यासाठी राज्य सरकारने पूर्वीचे 50 टक्के अनुदान ही क्षमता वाढवून आता नव्याने प्रत्येक शेतकऱ्याला 80 टक्के अनुदान देण्याची ठरवली आहे.

एकदा शेतकऱ्यांनी अनुदान घेतल्यानंतर तो लाभार्थी पुन्हा सात वर्षापर्यंत ठिबकचे अनुदान अनुदान घेऊ शकत नाही .

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे 80 टक्के अनुदान त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेऊन सुखी व समृद्ध व्हावे. 

ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विहीर अथवा बोअरवेल ची नोंद आपल्या सातबारा उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे अथवा पाण्याची तरतूद असणे बंधनकारक आहे.


ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे .

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

आठ अ उतारा

ओळखपत्र

मोबाईल नंबर

एवढ्या कागदपत्रांची लाभार्थ्याला आवश्यकता आहे .

या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या कृषी ऑफिसला भेट द्यावी .

या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सेवा केंद्र येथे जाऊन सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर भेट द्यावी अथवा खालील दिलेल्या लिंक वर भेट द्यावी.


https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login


धन्यवाद.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna