महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023

Tractor anudan yojna 2023

ट्रॅक्टर योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता वाटी याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत.


आपल्या राज्यातील शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा व त्याची आर्थिक उत्पन्न वाढून त्याला समाजामध्ये विशेष स्थान निर्माण व्हावी म्हणून राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना होय.


भारत देशामध्ये बहुसंख्य शेतकरी अनुसूचित जाती जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत . ही कुटुंबे आजही पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे आजही असंख्य शेतकऱ्यांना खूप काबाडकष्ट सहन करावी लागतात व त्यामुळे शेतीचे आर्थिक उत्पन्न देखील अल्प प्रमाणात असते.


प्रत्येक शेतकऱ्याने शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आधुनिक पद्धतीने केलेली शेती ही आर्थिक उत्पन्नामध्ये भर घालते व त्यामुळे शेतकरी हा सुखी व समृद्धी होण्यास खूप मदत मिळते. शेतकऱ्याचे जीवन सुखी व समृद्धी व्हावी व त्यांना शेती करत असताना कोणते काबाडकष्ट करायची गरज लागू नये म्हणून राज्य सरकारने कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली आहे.


महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजना घेण्यास पात्र आहे. परंतु अनुसूचित जाती जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंब व महिला यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलेला आहे.


ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतातील कामे कमी वेळेमध्ये व पटकन होण्यास मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न सुद्धा खूप वाढणार आहे.


ट्रॅक्टर अनुदान योजनेमधून अनुसूचित जाती जमातीतील व दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 50% अनुदान व सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळणार आहे.

कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर अनुदान योजनेबरोबरच शेतकरी हिताच्या अनेक यंत्रांचा देखील समावेश करण्यात आले आहे.

आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सेवा केंद्र ला भेट दिल्यानंतर महाडीबीटी पोर्टल वर सर्व योजनांची तुम्हाला माहिती मिळू शकते.


कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतल्यानंतर त्याला दहा वर्षे पुन्हा ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही .

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अठरा वर्षाचा पूर्ण असणे गरजेचे आहे .


ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला त्याचे नाव सात बारा उताऱ्यात असणे गरजेचे आहे याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. लाभार्थ्याकडे मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.


ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन महाडीबीटी पोर्टलवर अप्लाय करणं गरजेचे आहे . महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कृषी विभागातर्फे लॉटरी पद्धतीने त्याची निवड होते आपली निवड झाल्यानंतर तशी माहिती आपल्या मोबाईल नंबर वर अथवा कृषी विभागातर्फे लाभार्थ्याला ती माहिती दिली जाते.

कृषी विभागातर्फे निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला ट्रॅक्टर स्वतः खरेदी करावा लागतो व त्यानंतर कृषी विभागातर्फे त्याची तपासणी केली जाते जिओ टॅग पद्धतीने ट्रॅक्टर व लाभार्थ्याचा फोटो अपलोड केला जातो व सर्व बिलांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते व सर्व सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सबसिडी ही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

म्हणजे सर्व पैसे शेतकऱ्याला अगोदर देऊनच ट्रॅक्टर खरेदी करावा लागतो याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकऱ्याला एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे.


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लाभार्थ्याला आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

आठ अ उतारा

अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

मोबाईल नंबर

ट्रॅक्टरचे कोटेशन बिल


एवढ्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे आहे .

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा फायदा घेतल्यानंतर शेतकरी हा नक्कीच सुखी व समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाण्यासाठी खालील लिंक वर अवश्य एक वेळ भेट द्या .

http://www.newsjunner.com


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna