शेततळे योजना - मागेल त्याला शेततळे shettale yojna

मागेल त्याला शेततळे योजना 2023 

Shettale yojna

राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे देण्याचे ठरवले असून जो शेतकरी शेततळ्यासाठी अर्ज करेल त्याला शेततळे देण्याचे सरकारने ठरवले आहे. शेततळ्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेत पिकवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न व सक्षम होवू शकतो.त्याला शेततळे असल्यामुळे तीनही ऋतूत पीक घेता येवू शकते.  शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे..


ह्या योजनेसाठी  राज्य शासनाकडून  शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला कमी कालावधीत व स्वतःचे पैसे खर्च केले तरी त्याला त्याचे पूर्ण अनुदान देण्यात येणार आहे...


ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही म्हणजे विहीर अथवा बोर किंवा दुसरे कोणतेही पाण्याचे साधन नाही अशा शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही 


शेततळे योजनेसाठी जर तुम्ही महाडीबिटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज केला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज करण्याची गरज नाही.  जर आपले सोडत मध्ये लगेच नाव आले नाही तरी या योजनेचा फायदा पुढील पाच वर्षांमध्ये केव्हाही होऊ शकतो.


शेततळे योजनेचे फायदे खालीलप्रमाणे

भारत देशात बऱ्याचश्या राज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर याचा परिणाम दिसू लागले आहेत. पावसाच्या टंचाईने पिकांवर परिणाम होऊ नये व शेतकरी अडचणीत येवू नये म्हणून सरकारने ही योजना अमलात आणली आहे.

दुष्काळावर मात करून कमी पाण्यात उत्पादन वाढवण्याचे सामर्थ्य ह्या योजनेत आहे .

ह्या योजनेचा मुख्य उद्देश कमी पाण्यात शेती उत्पादन वाढवणे , जिरायत शेती बागायत करणे व शेतकरी सुखी आणि समृद्ध करणे हा आहे.

लाभार्थ्याला त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे तसेच ती जमीन शेततळ्यासाठी तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे..


 राज्य सरकार शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे 

आधार कार्ड

पॅनकार्ड

बँक पासबुक

सातबारा व आठ अ उतारा

आधार कार्ड बरोबर लिंक असलेला मोबाईल नंबर

 अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी कार्यालय अथवा संबंधित  अधिकारी ह्यांची भेट घ्यावी..


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna