अपंग पेंशन योजना सरकार अपंगांना देणार 1000 रुपये पेंशन apang yojna

 अपंग पेन्शन योजना apang yojna  2023 

दिव्यांग पेन्शन योजना 

https://www.newsjunner.com/2023/05/P

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये अपंग पेन्शन योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत

या योजनेसाठी लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे त्याची पात्रता त्याचे वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

आपल्या भारत देशामध्ये अपंगांची खूप मोठी संख्या आहे.

अपंगांना नेहमीच परावलंबी जीवन जगाव लागते. त्यांंचे आयुष्य खूप खडतर असते. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी ही एक योजना अपंग / दिव्यांग पेन्शन योजना आहे.

या https://www.newsjunner.com/2023/05/P 

अपंग अथवा दिव्यांगाला दरमहा सरकार एक हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे. या रकमेमुळे अपंगाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. या योजनेमुळे अपंगाला स्वावलंबी जीवन जगता येईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अपंगाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्याकडे 40% एवढे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

https://www.newsjunner.com/2023/05/P

अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीचे वय 18 ते 65 वयोगटातील असावी लागते.

जर एखादा अपंग व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

अपंग व्यक्ती हा अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो व त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीस ते चाळीस हजार इतकी असावी लागते .

अशा अनेक दिव्यांग योजना सरकार राबवत असते जेणेकरून दिव्यांगांना समाजामध्ये मानाचे स्थान तयार करता येईल व दिव्यांग स्वावलंबी जीवन जगून आपला उदरनिर्वाह करतील यासाठी राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेत असते.

अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

पासपोर्ट फोटो

तहसीलदार उत्पन्नाचा दाखला

अपंग प्रमाणपत्र 40%

मोबाईल नंबर

ओळखपत्र

रेशनिंग कार्ड

एवढ्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते .

अपंग अर्जदाराला जरी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी तलाठी कार्यालयात भेट देऊन संपूर्ण अर्ज व त्याची माहिती भरून संबंधित असलेली आवश्यक कागदपत्रे येथे जमा करावी . त्यानंतर तहसीलदार / तलाठी त्या कागदपत्रांची पडताळणी करून अपंगाला त्या योजनेचा लाभ देतात.

त्यासाठी अपंगाने आपल्या तलाठी कार्यालयाला अवश्य भेट द्यावी.

धन्यवाद.

अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर अवश्य भेट द्यावी.

https://www.newsjunner.com/2023/05/P


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण