विधवा महिला पेन्शन योजना vidhva mahila penshan yojna व त्यासाठी कुठे अर्ज करायचा ह्याची संपूर्ण माहिती

 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 

Vidhva mahila penshan yojna 

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना त्याची नोंदणी आणि पात्रता याची माहिती खालील प्रमाणे

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेची आपण माहिती पाहणार आहोत या योजनेची नेमकी उद्दिष्टे व लाभ कोणते पात्रता व आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील गरीब विधवा महिला यांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे व स्वावलंबि करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून गरीब विधवा महिलांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करण्याची गरज लागणार नाही त्यामुळे म्हातारपणामध्ये त्यांचे जीवन सुखाचे व समृद्धीचे असेल ह्या  योजनेमुुळे ळर्व विधवा महिलांना दर महिन्याला शासनातर्फे त्यांच्या बँकेच्या खात्यात सहाशे रुपये जमा होणार आहे ही रक्कम आता नव्याने वाढली असून हजार रुपये करण्यात आली आहे. 

ज्या महिलेचा पती वारला आहे किंवा पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला कोणतेही आर्थिक मदत कोणाकडूनही होत नाही त्या विधवा महिलेचे जीवनाचे आर्थिक व्यवहार भागू शकत नाही अथवा दैनंदिन गरजा भागत नाही त्यामुळे त्यांचे जीवन सुखाचे व समृद्धीची व्हावे म्हणून या योजनेची स्थापना झाली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा व त्या लाभार्थ्याची वय 65 वर्षापेक्षा कमी असावे .

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे पंचवीस हजारापेक्षा जास्त नसावी

अर्जदाराची स्वतःचे बँक खाते असावी.

लाभार्थी विधवा महिलेला तिची मुले यांचे वय अठरा वर्षाखालील असावे.

विधवा महिलेची मुले अठरा वर्षाची होई पर्यंत तिला पेन्शन मिळण्याची तरतूद ह्या योजनेत केली आहे.

ह्या योजनेसाठी महिलेला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

विधवा महिलेला मिळणारी पेन्शन तिच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

रेशन कार्ड

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

पासपोर्ट फोटो

मोबाईल नंबर

उत्पन्नाचा दाखला

जातीचे प्रमाणपत्र असल्यास

पतीचा मृत्यूचा दाखला

विधवा पेन्शन योजनेचा अर्ज तुम्हाला तलाठी कार्यालयात उपलब्ध होईल.

अर्जाची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तो अर्ज तलाठी कार्यालयात जमा करावे लागेल. 

अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात भेट द्यावी व या योजनेची संपूर्ण माहिती तलाठी अथवा कोतवाल यांच्याकडून माहिती करून घ्यावी. 

धन्यवाद

ह्या योजनेसाठी शासकीय वेबसाइट ला भेट द्या

http://mumbaisuburban.gov.in/scheme/sanjay-gandhi-niradhar-pension-scheme/

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna