गाय गोठा अनुदान योजना - शेतकरी सक्षमीकरण योजना gay gotha anudan yojna

 गाय गोठा अनुदान 2023

Gay gotha anudan yojna

शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व शेतकरी कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याने या योजनेची स्थापना केली

ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो त्यामुळे शेतकरी हा पूर्णता दुग्ध व्यवसाय वर शेती वरती अवलंबून असतो

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावे म्हणून गाय गोठा अनुदान योजनेची स्थापना झाली


या योजनेमुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भेट द्यावी व असलेली संपूर्ण माहिती जाणून घ्यावी

ग्रामीण भागामध्ये शेतकरी पूर्णता शेती वरती अवलंबून असतो आणि शेतीच्या  पिकातील उत्पन्नाचे दर हे अनिश्चित असतात त्यामुळे शेतकरी हा नेहमीच आर्थिक विवंचनेमध्ये असतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2022 ला या योजनेची स्थापना झाली


शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक अडचणींना  सामोरे जावे लागते त्याच्यामुळे त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला तर ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील म्हणून गाय गोठा योजनेची स्थापना झाली

 शेतकरी जनावरे पाळत असताना प्रत्येक शेतकऱ्याला जनावरांसाठी निवारा शेड बांधणे जमत नाही त्यामुळे जनावरांचे ऊन पाऊस वारा यांची यांच्यापासून संरक्षण होण्यापासून अडचण तयार होते त्यामुळे गोपालक त्यांच्या गाई व वासरे यांचे संरक्षण करण्यासाठी असमर्थ असतात म्हणून म्हणून त्या जनावरांची संरक्षण व्हावे म्हणून गाय गोठा अनुदान भेटल्यावर शेतकरी हा गाय गोठा बांधू शकेल व त्यामुळे जनावरांचे संरक्षण होईल. म्हणून गायगोठा योजना आवश्यक आहे.

गाय गोठा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचे संरक्षण होणार आहे त्यांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आजारपणासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

गाय गोठा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

खालीलप्रमाणे

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव

जॉब कार्ड

उत्पन्नाचा दाखला

मोबाईल नंबर

रहिवासी दाखला

सातबारा आणि आठ अ

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तिथे गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा व त्यातील संपूर्ण माहिती भरावी  व ती सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालय अथवा पंचायत समितीमध्ये द्यावी. गाय गोठा अनुदान घेण्यासाठी निकष आहेत ते निकष पूर्ण असले तर तो लाभार्थी  त्या योजनेसाठी पात्र होईल...



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna