Manrega job card मनरेगा योजना 2023

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2023

केंद्र सरकार योजना 2023

मनरेगा योजना 2023

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये मनरेगा योजना विषयी अथवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी असणारी संपूर्ण माहिती, लाभार्थ्याची वय ,त्याच्या अटी याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

भारत देशामध्ये आजही ग्रामीण स्तरावर अनेक कुटुंबांना रोजगारासाठी नेहमीच भटकंती करावी लागते त्यामुळे त्यांना आर्थिक बाबींचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसतो.

ग्रामीण स्तरावरील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मनरेगा योजना अमलात आणली.

मनरेगा योजना म्हणजे ग्रामीण भागातील शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील यांना आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांसाठी मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कुटुंबांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मनरेगा योजना ही शेतमजुरांना किंवा आर्थिक दुर्बल घटकांना अथवा महिला आणि पंचायत राज संस्थांना आर्थिक बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र सरकार ही ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी प्रति कुटुंब शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी या योजनेच्या माध्यमातून देते.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायत मार्फत जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे व त्यासाठी व रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन जॉब कार्ड काढून ठेवणे आवश्यक आहे.

त्या जॉब कार्ड मध्ये कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्याचे नावे व फोटो असणे बंधनकारक आहे . त्या जॉब कार्ड मुळे संबंधित जॉब कार्डधारक ग्रामपंचायत इकडे कामाची मागणी करू शकतात आणि काम मिळू शकतात .

ग्रामपंचायत मार्फत जॉब कार्डधारकाला अकुशल कामासाठी काम मागणीचा अर्ज करता येतो व त्यामुळे पंधरा दिवसाच्या आत जॉब कार्ड धारकाला काम प्रदान करण्यात येते.

जॉब कार्डधारकांनी काम मागणी केल्यानंतर जर ग्रामपंचायत ने पंधरा दिवसाचे काम उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मजुराला मनरेगा योजनेच्या नियमानुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा अधिकार आहे.

ग्रामसभेच्या शिफारशीनुसार एखाद्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत परिसरातील कामाची माहिती जॉब कार्ड धारकाला करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायत विभागाची असते.

ग्रामीण भागातील प्रत्येक प्रौढ सदस्याला ग्रामपंचायतच्या मनरेगा अंतर्गत होणारी कामे घेण्याचा अधिकार आहे.

जॉब कार्ड धारकाला त्याच्या राहत्या घरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत काम देणे ग्रामपंचायतला बंधनकारक आहे . जॉब कार्ड धारकाला जर पाच किलोमीटरच्या पुढे जर काम दिले तर प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे.

मनरेगा योजना राज्यातील मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे कारण अकुशल कामगार खर्चाच्या 100% आणि कार्यक्रमाच्या भौतिक खर्चाच्या 75 टक्के केंद्राने वहन केले आहे. गरीबाच्या रोजगाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी या कायद्याचा लाभ घेण्यासाठी राज्यांना अतिरिक्त प्रोत्साहन हे केंद्र सरकारकडून मिळत असते.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत भारतीय ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी दिली जाते . रेखा योजनेचा फायदा मिळवण्यासाठी पात्र व्यक्तींनी जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे हे कार्ड रोजगारासाठी पात्रतेचा पुरावा म्हणून कार्य करत अ.सते.

मनरेगा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंट भरावी लागतात.

मनरेगा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहेत.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

मोबाईल नंबर

फोटो

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आंबेगाव योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयाला एक वेळा अवश्य भेट द्यावी.

धन्यवाद

अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळा अवश्य भेट द्या .

http://www.newsjunner.com




Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna