ड्रॅगन फ्रूट फळबाग लागवड योजना 2023 शेतकर्‍यांना मिळणारं 1 लाख 60 हजार रुपये अनुदान

 ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना 2023 

Dragon fruit anudan yojna 2023 

ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखांमध्ये ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड अनुदान योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेसाठी शेतकऱ्याचे वय पात्रता व त्या संदर्भात असणारे अटी याची सर्व माहिती या लेखांमध्ये आज आपण पाहणार आहोत.

भारत हा कृषीप्रधान देश असल्याकारणाने आजही मोठ्या प्रमाणात भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने शेती केली जाते. शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याकारणाने आजही त्याचे उत्पन्न हे उदरनिर्वाह पुरतेच असते.

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे आर्थिक उत्पन्न वाढले तर शेतकऱ्याला समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण होणार आहे.

आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी हा सुखी व समृद्धी होणार आहे. शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करावी शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवावे यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड योजना अमलात आणली.

आज अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसू लागली आहेत शेतकरी आपल्या शेतामध्ये आता फळबाग लावताना दिसत आहे. आजही शेतकरी डाळिंब, स्ट्रॉबेरी, कलमी पेरू , कलमी आंबे , चिक्कू , सिताफळे , फणसे व ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड करून आपल्या आर्थिक उत्पन्न वाढवताना दिसत आहे आजही फळांना मार्केटमध्ये उच्च दर असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील ड्रॅगन फ्रुट ची अनेक ठिकाणी लागवड झाल्याचे दिसून येत आहे. ड्रॅगन फ्रुट चा उपयोग भारतामध्ये व परदेशामध्ये औषधी फळ म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ड्रॅगन फ्रुट चा उपयोग हा अनेक आजारांवरती औषध म्हणून केला जातो म्हणून ड्रॅगन फ्रुट ची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

ड्रॅगन फ्रुट निवडुंग जातीतील वेलवर्गीय फळझाड आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला वन्य प्राण्यांचा कुठलाही त्रास होत नाही. ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग जातीतील वेलवर्गीय पिकांमध्ये मोडत असल्याकारणाने त्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जरी शेतकऱ्याला भासली तरी हे फळ झाड कमी पाण्यामध्ये तग धरू शकते. ड्रॅगन फूड ची लागवड द्राक्ष बागेप्रमाणेच केली जाते अथवा द्राक्ष बागेला जशी मांडव पद्धत केली जाते तशीच लागवड ड्रॅगन फ्रुट फळबागेला सुद्धा केली जाते.

ड्रॅगन फ्रुट लागवड केल्यानंतर एका झाडाला कमीत कमी 40 ते 100 फळे येतात. ड्रॅगन फ्रुट हे कमी जागेतही जास्त उत्पादन देणार फळझाड आहे त्यामुळे भविष्यामध्ये ड्रॅगन फ्रुट ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्यांची नक्कीच आर्थिक उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. ड्रॅगन फ्रुट लागवड केल्यानंतर ड्रॅगन फ्रुट पासून शेतकऱ्यांना कमीत कमी 30 वर्ष उत्पादन मिळणार आहे म्हणजेच ड्रॅगन फ्रुट चे आयुष्यमान हे 30 वर्षापर्यंतच आहे. त्यामुळे एकदा ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी खर्च केला तर वारंवार गरज पडणार नाही ही एक शेतकऱ्यांच्या जमेची बाजू आहे.

ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवडीसाठी राज्य सरकारकडून हेक्‍टरी एक लाख साठ हजार रुपये एवढे अनुदान मिळते.

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याची निवड कृषी विभागातर्फे लॉटरी पद्धतीने केली जाते तशी माहिती शेतकऱ्याला कृषी विभागातर्फे अथवा आपल्या मोबाईलच्या एसएमएस द्वारे कळते याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

आठ अ उतारा

अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र असल्यास

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

शेतकऱ्याला जर ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड योजनेविषयी व अनुदानाविषयी जर काही माहिती हवी असेल तर त्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाला भेट देऊन कृषी अधिकाऱ्याकडून संबंधित माहिती जाणून घ्यावी.

धन्यवाद .

अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna