पीएम किसान योजना इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजना 2023, शेतकर्‍यांना मिळणार 50 % अनुदान motor pump anudan yojna 2023

 इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजना 2023

इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान

इलेक्ट्रिक मोटर पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान.

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजनेविषयी असणारी सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत व त्यासाठी लाभार्थ्याचे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे , त्याच्या अटी, लाभार्थ्याचे वय याची देखील संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भारत हा कृषीप्रधान देश असल्याकारणाने अनेक जणांची जीवन हे शेती वरती अवलंबून आहे. शेती करत असताना शेतकऱ्याला नेहमीच वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो . शेतकऱ्याचे जीवन सुखी व समृद्धी होण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक प्रकार म्हणजे इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजना होय.


राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते परंतु बरेच शेतकऱ्यांना या योजना विषयी कुठली कल्पना नसते किंबहुना शेतकरी देखील कृषी कार्यालयाला भेट देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना योजना माहित होतं नाही .


महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटर पंपासाठी 50% अनुदान जाहीर केले आहे . त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.


राज्य सरकार नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेगवेगळ्या योजना आहेत त्यातीलच एक योजना म्हणजे इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजना होय .


ज्या शेतकऱ्यांना शेती करत असताना पारंपारिक पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे परंतु पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे अभावी कुठलीच यंत्रसामुग्री नसते म्हणून शेतकऱ्याला शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही अडचण दूर होण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदानाचा नक्कीच उपयोग होणार आहे .


इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जवळच्या महा इ सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावयाचा आहे अर्ज केल्यानंतर लाभार्थीची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते वाढदिवस झाल्यानंतर तशी माहिती आपल्याला कृषी अधिकाऱ्याकडून कळते अथवा आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे देखील कळते.


अधिक माहितीसाठी होळीच्या कृषी कार्यालयाला अवश्य भेट द्यावी व आपली असणारी शंका कृषी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून समजून घ्यावी.


इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

आठ अ उतारा

अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

अनुसूचित जाती जमाती दाखला असल्यास

मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला


वरील दिलेल्या एवढ्या कागदपत्रांची लाभार्थ्याला आवश्यकता आहे .


अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com






Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna