पीएम किसान योजना कुसुम सोलर पंप योजना 2023 kusum solar pump yojna

 कुसुम योजना महाराष्ट्र सोलर पंप योजना

Kusum solar pump yojna 2023

कुसुम सोलर पंप योजना 2023

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये कुसुम सोलर पंप योजना 2023 या योजनेची संपूर्ण माहिती व त्यासाठी लाभार्थ्याला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे त्याच्या अटी व नियम ह्या संपूर्ण बाबींचा आढावा घेणार आहोत.

भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे व शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हा सरकारचा मुख्य उद्देश आहे त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना अमलात आणली.

कुसुम सोलर पंप योजनेमुळे शेतकऱ्याला शेतीसाठी 24 तास उपलब्ध होणार आहे व त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे .

कुसुम सोलर पंप योजना ही भारताचे वित्तमंत्री माननीय श्री अरुण जेटली यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणली आहे.

कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र सरकारची योजना असून कमीत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देणे व शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक असणारा खर्च हा तीन पद्धतीने विभागला आहे .

1 सरकार शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान देणार आहे

2 30 टक्के खर्च हा सरकार शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात

देणार आहे

3 शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेसाठी एकूण योजनेच्या केवळ 10 टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे देण्यात आली आहे .

 1 लाभार्थ्याला विहीर, नदी, बोरवेल , शेततळे किंवा पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध असल्यास असा लाभार्थी अर्जासाठी पात्र असेल .

  2 ज्या लाभार्थ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसेल अशा लाभार्थ्याला अर्जासाठी पात्र ठेवण्यात येईल .

  3  ज्या लाभार्थ्याला 2.5 एकर शेत जमीन असेल त्याला 3 एचपी. डीसी तर पाच एकर शेत जमीन असणाऱ्याला 5 एचपी डीसी व पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या लाभार्थ्याला 7.5 एचपी डीसी तसेच जास्त क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देण्यात येणार आहे याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी .


कुसुम सोलर पंप योजनेमुळे शेतकऱ्याला आता दिवसा वीज उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला रात्री अप रात्री पाणी भरण्यासाठी जागे राहण्याची गरज राहणार नाही .

या योजनेमुळे शेतकऱ्याला 24 तास वीज उपलब्ध होणार असल्याकारणाने शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास खूप मोठी मदत होणार आहे .

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थ्याची आवश्यक असलेली पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे .

1 लाभार्थी हा भारताचा रहिवासी असावा

2 लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असावी .

3 या योजने अंतर्गत 0.5 मेगा वॅट ते 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर पंप      प्रकल्पासाठी अर्जदार हा अर्ज करू शकतात .

कुसुम सोलर पंप योजनेसाठी असणारी लाभार्थी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

शेतकरी

शेतकरी गट

शेती उत्पादक संस्था

सहकारी संस्था

कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

पासपोर्ट फोटो

सातबारा उतारा

आठ अ उतारा

मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला

अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र असल्यास

एवढ्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे .

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी अर्ज फी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे .

0.5 मेगा वॅट साठी रुपये 2500 + gst

1 मेगा वेट साठी रुपये 5000+ gst

1.5 मेगावेट साठी रुपये 7500+ gst

2 मेगा वेट साठी रुपये 10,000 + gst

अर्जदाराने अर्ज करण्यासाठी वरील माहिती लक्षात ठेवणे गरजेचे आहे .

शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेसाठी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने महा ऊर्जा पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे आहे . लाभार्थ्याची निवड झाल्यावर त्याला एसेमेस द्वारे माहिती मिळणार आहे.


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna