मिनी डाळ मिल योजना 2023 mini dal mil yojna लाभार्थ्यांना मिळणारं 1 लाख 50 हजार रुपये अनुदान
मिनी डाळ मिल योजना 2023
Mini dal mil yojna
डाळ मिल योजना 2023
नमस्कार मित्रांनो
आज या लेखामध्ये आपण डाळ मिल योजनेविषयी असणारी माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे, लाभार्थीचे वय व त्यासाठी असणारे अटी याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मिनी डाळ मिल योजना आहे .
मिनी डाळ मिल योजनेसाठी लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे .
मिनी डाळ मिल योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, दीड लाख रुपयाचे अनुदान डाळ मिल खरेदी करण्यासाठी मिळते तर इतर लाभार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये इतके अनुदान मिळते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी , महिला यांना 60 टक्के अनुदान देण्यात येते तर इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते.
मिनी डाळ मिल योजना
मिनी डाळ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व विशेष करून महिला वर्गाला शेती करत असताना शेतीबरोबरच डाळ मिल योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करून आपली आर्थिक उत्पन्न वाढवता येईल व आर्थिक उत्पन्नामुळे शेतकरी सुखी व समृद्धी होण्यास मदत मिळेल म्हणून राज्य सरकारने डाळ मिल योजना अमलात आणली.
मिनी डाळ मिल योजना
मिनी डाळ मिल योजनेमुळे कमी भांडवलामध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी या यंत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे .शेतीमध्ये धान्य तयार करून आणल्यानंतर त्याचे डाळीमध्ये रूपांतर करण्यासाठी डाळ मिल यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
डाळ मिल उद्योग हा कमी भांडवलामध्ये शेतकऱ्याला जास्त पैसे कमवून देणारा व्यवसाय असल्याकारणाने शासनाने यासाठी 50 ते 60 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा व स्वतःची आर्थिक उत्पन्न वाढवावे आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी सुखी व समृद्धी होण्यास मदत होणार आहे व शेतकरी स्वावलंबी होणार आहे .
मिनी डाळ मिल योजना
मिनी डाळ मिल योजनेसाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे . लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची कृषी विभागातर्फे लॉटरी पद्धतीने निवड केली जाते .
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर तशी माहिती कृषी अधिकारी लाभार्थ्याला कळवतात अथवा लाभार्थीच्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे निवडीची माहिती कळते.
मिनी डाळ मिल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
सातबारा उतारा
आठ अ उतारा
अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र असल्यास
अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास
मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला
वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लाभार्थ्याला डाळ मिल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
मिनी डाळ मिल योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी विभागाला भेट देऊन तेथील कृषी अधिकाऱ्याकडून संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment