पोस्ट ऑफिस विमा योजना 399 रुपये
पोस्ट ऑफिस योजना 399
पोस्ट ऑफिस विमा योजना 2023
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी असणाऱ्या अटी, लाभार्थ्याचे वय व आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रे याची माहिती पाहणार आहोत.
भारत सरकार हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते . भारत सरकारने पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी एकदम अल्प दरामध्ये विमा संरक्षण देण्याचे ठरवले आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आता प्रत्येक नागरिकाला 399 रुपये मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळणार आहे.
भारतीय पोस्ट विभागाने टाटा ए आई जी कंपनी सोबत करार करून देशातील गोरगरीब व आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी त्यांचा भविष्याचा विचार करून अपघात संरक्षण विमा योजना आणली आहे यामध्ये लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला 399 रुपयाचा प्रीमियम काढून 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे पोस्ट ऑफिस आणि टाटा ए आईजी यांच्यातील झालेल्या करारानुसार 18 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे बंधनकारक आहे .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत लाभार्थी वार्षिक 399 रुपयांच्या हप्त्यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळू शकतात .
पोस्ट ऑफिस विमा योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपये पर्यंतचा खर्च व रुग्णालयात दाखल न होता घरीच उपचार घेतल्यास 30 हजार रुपये संरक्षण म्हणून दिले जाते .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 हजार रुपये म्हणजेच रोज 1 हजार रुपये दिले जातात .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत कुटुंबाला प्रवास खर्च म्हणून 25 हजार रुपये देखील मिळणार आहेत .
पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत कोणत्याही कारणाने लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या अंतिम संस्कार साठी 5 हजार रुपये दिले जातात .
या योजनेअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1 लाख रुपये पर्यंत ची तरतूद या योजनेत केलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय हे 18 ते 65 वयोगटातील असावे लागते.
पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तिथे जमा करावयाची आहे.
पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर
वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची लाभार्थ्याला आवश्यकता असते.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधून सर्व माहिती जाणून घ्यावी.
Comments
Post a Comment