पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना 2023 pvc pipe yojna शेतकर्यांना मिळणार 15,000 रुपये अनुदान
पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना 2023
पाईपलाईन अनुदान योजना 40% मिळणार अनुदान
शेतकऱ्यांना मिळणार पाईपलाईन करण्यासाठी आता 15,000 रुपये अनुदान .
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखामध्ये पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना विषयी असणारी सर्व माहिती , त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याचे वय त्याची पात्रता आवश्यक असणाऱ्या सर्व अटी याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे असंख्य शेतकरी शेतीवर अवलंबून असतात. शेती करत असताना त्यांना नेहमीच वेगवेगळे अडीअडचणींचा सामना करावा लागतो यातीलच एक अडचण म्हणजे शेतीमध्ये पाईपलाईन नसल्यामुळे शेती पिकवणे अवघड होते ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्याला एक मदत म्हणून राज्य सरकारने पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना अमलात आणली .
शेती करत असताना शेतकऱ्याला विहिरीतले अथवा शेततळ्यातली अथवा बोरवेल चे पाणी दुसरीकडे नेऊन शेती करता आली पाहिजे त्यासाठी पाईपलाईन ची खूप मोठी आवश्यकता शेतकऱ्याला नेहमीच असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीवर मात करणे अशक्य झाले आहे त्यामुळे कृषी विभागाच्या पीव्हीसी पाईपलाईन योजनेचा जर शेतकऱ्यांनी फायदा घेतला तर ही अडचण दूर होण्यास मोठी मदत होणार आहे .
शेतकऱ्याला नेहमीच मदत करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना अमलात आणत असते .
राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यासाठी नवीन नवीन योजनेच्या माध्यमातून मोटर संच , ट्रॅक्टर, पावर टेलर, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, फळबाग योजना , शेळी पालन योजना, गाय गोठा अनुदान योजना, शेततळे योजना , शेततळे अस्तरीकरण, मळणी यंत्र, रोटावेटर, नांगर अशा योजना राबवत असते ज्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढून शेतकऱ्याला समाजामध्ये एक मानाचे स्थान निर्माण होईल हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
कृषी विभागातर्फे राबवलेली एक योजना म्हणजे पीव्हीसी पाईप लाईन अनुदान योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त 15,000 रुपयांच्या अनुदान कृषी विभागा तर्फे अथवा राज्य सरकार तर्फे मिळणार आहे .
पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी चाळीस ते पंचेचाळीस टक्के अनुदान मिळणार आहे अथवा जास्तीत जास्त अनुदान हे पंधरा हजार रुपयापर्यंत मिळणार आहे याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी लाभार्थ्याला आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अथवा आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे .
लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची निवड कृषी विभागातर्फे लॉटरी पद्धतीने केली जाते जर लाभार्थ्याची निवड झाली तर तशी माहिती कृषी विभागातर्फे त्याला कळवण्यात येते अथवा त्याच्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे त्याला माहिती भेटते.
पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
सातबारा उतारा
आठ अ उतारा
अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र असल्यास
अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास
मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला
कोटेशन बिल
एवढ्या कागदपत्रांची शेतकऱ्याला आवश्यकता असते.
अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या कृषी विभागाला भेट देऊन पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेची माहिती घ्यावी .
धन्यवाद
अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment