पीएम किसान योजना / तार कुंपण योजना 2023 ,शेतकर्‍याला मिळणार 90 % अनुदान

 तार कुंपण योजना 2023

तार कुंपण कृषी योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये तार कुंपण योजनेविषयी असणारी सर्व माहिती व त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत .

शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार मार्फत मिळणार आहे 90 टक्के अनुदान .

तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारतर्फे 90 टक्के अनुदान देण्याचे ठरले आहे .

शेतकऱ्याला वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा शेतातील शेती पिकांचे वारंवार वन्य प्राण्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे परंतु शेतकऱ्यांनी जर आपल्या शेताला तारेचे कुंपण केले तर आपल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे परंतु शेतीला तारेचे कुंपण करायचे असल्यास त्यासाठी खूप मोठा खर्च होत असतो व एवढा मोठा खर्च करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे बरेच शेतकरी आपल्या शेताला तार कुंपण करू शकत नाही म्हणूनच राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या शेतीसाठी तार कुंपण करण्यासाठी 90% एवढे अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची जमीन जंगलात किंवा डोंगर भागामध्ये आहे त्यामुळे शेतीला शेळ्या वन्यप्राणी व इतर प्राण्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येत असतो त्याचे परिणाम त्याच्या आर्थिक व्यवस्थेवरती पण होतो . 

शेतकऱ्याला त्याची शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी व वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान रोखण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे व या योजनेमुळे शेतकरी त्यांच्या शेताला कुंपण घालण्यासाठी जाळीचा वापर करू शकणार आहे .

महाराष्ट्रातील शेतकरी आता तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात परंतु त्यांनी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून आवश्यक ते कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रदान करणे आवश्यक आहे .

परंतु ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आपले विभागाच्या पंचायत समिती मार्फत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता.

महाराष्ट्र सरकार तारकुंपण योजनेसाठी शेतकऱ्याला 90% दराने अनुदान देणार आहे उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः खर्च करावयाची आहे .

तार कुंपण योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

सातबारा उतारा

आठ अ उतारा

आधार कार्ड

कास्ट सर्टिफिकेट

मोबाईल नंबर

बँक पासबुक

इत्यादी सर्व कागदपत्रे तुम्हाला पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहे.

अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळा अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna