मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023, शेतकर्यांना मिळणारं 50 % अनुदान
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023
मल्चिंग पेपर अनुदान
नमस्कार मित्रांनो
आज आपण मल्चिंग पेपर अनुदान योजनेविषयी असणारी माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत.
आज आपल्या देशामध्ये शेती करत असताना बराच आमुलाग्र बदल झालेला पहावयास मिळतो त्यामुळे शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसावयास मिळत आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उत्पादनामध्ये वाढ झाल्याचा दिसून येतो व त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढून शेतकरी सुखी व समृद्धी होण्यास मोठी मदत मिळत आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांची शेती उत्पादन वाढवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपायोजना राबवत असते त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे शेतीसाठी लागणारी मल्चिंग पेपर अनुदान योजना होय . मल्चिंग पेपर मुळे शेतीसाठी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचे दिसवायास मिळते .
शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांना ऐवजी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो त्यामुळे भाजीपाला लागवड साठी मल्चिंग पेपरचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो व त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर अनुदानासाठी 50% अनुदान देण्याचे ठरवले आहे.
मल्चिंग पेपरचा वापर केल्याने भाजीपालांच्या पिका मध्ये तन उगवत नाही त्यामुळे तन नाशक फवारणी देखील वाचते व तन नाशकांची फवारणी करण्याची गरज नसल्यामुळे खर्चात बचत देखील होते व कमी पाण्यामध्ये पिक उत्पादन घेता येते परिणामी पीक उत्पादनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर साठी टक्के अनुदान मिळत आहे व जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला मल्चिंग पेपर साठी 32000 पर्यंत अनुदान मिळू शकते याची देखील नोंद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
मल्चिंग पेपर अनुदान योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळणार आहे त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
मल्चिंग पेपर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावयाचा आहे त्यानंतर कृषी विभागातर्फे अर्जदाराची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते व निवड झाल्यानंतर शेतकऱ्याला तशी माहिती देखील कृषी विभागातर्फे मिळते अथवा तिच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे देखील कळते.
मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
सातबारा उतारा
आठ अ उतारा
मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला
अर्ज करण्यासाठी व वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लाभार्थ्याला असते .
अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या .
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment