ऑईल मिल ( तेल मशीन ) अनुदान योजना 2023 शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार अनुदान

ऑइल मिल अनुदान योजना 2023

ऑइल मिल फिल्टर प्रेस सह अनुदान

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत असणाऱ्या ऑइल मिल फिल्टर प्रेस सह या योजनेची संपूर्ण माहिती व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या संदर्भात सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत .

दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये खाद्यतेल हा अविभाज्य घटक बनला आहे भारत देशाची लोकसंख्या ही 140 कोटीहून अधिक झालेली आहे व त्यामुळे लोकसंख्येनुसार दरवर्षी खाद्य तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे व त्यामुळे मागणी पुरवण्यासाठी सरकारने ऑइल मिल अनुदान योजनेची अंमलबजावणी राबवली आहे .

भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या रिफायनर तेलाची उत्पादने आलेली आहेत व त्याचबरोबर बाजारात खाद्यतेलाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे व त्याचबरोबर तेलाचे विविध प्रकारे बाजारामध्ये आता पहावयास मिळत आहे.

बाजारात येणाऱ्या विविध तेलाच्या प्रकारामुळे आज भारत देशातील अनेक तरुणांची प्रकृती ढासाळताना देखील दिसत आहे व या निकृष्ट तेलामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त दिसू लागली आहे.

ऑइल मिल फिल्टर प्रेस सह योजनेमुळे शेतकऱ्यांना शुद्ध तेलाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे व हे शुद्ध तेल बाजारात देखील ते विकू शकतात त्यामुळे शेतकऱ्याच्या आरोग्यासाठी व आर्थिकदृष्ट्या मोठे वरदान ठरणार आहे.

सध्या तेल बियाण्यांपासून तेल काढण्याचा व्यवसाय खूप यशस्वी होताना दिसत आहे व त्यामुळेच या योजनेचा लाभ घेऊन जर आपल्याला या व्यवसायातून अधिकाधिक नफा कमवायचा असेल तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.

भारत देशातील दैनंदिन जीवनातील खाद्य तेलाची गरज पुरवण्यासाठी सरकारला प्रतिवर्षी परदेशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते त्यामुळे त्यामुळे भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर असणारी परकीय चलन खर्च करावे लागते व त्याचे दुष्परिणाम म्हणून होणारी महागाई ला भारत सरकारला सामोरे जावे लागत आहे व त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील महागाई मध्ये होरपळत आहे.

त्यामुळेच शेतकऱ्यांनी ऑइल मिल या योजनेचा लाभ घेऊन आपल्या दैनंदिन जीवनातील लागणारे खाद्य तेलाची गरज भागवून उरलेले खाद्यतेल बाजारात विकून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

ऑइल मिल फिल्टर प्रेस सह या योजनेमुळे शेतकरी शेती करत असताना शेतीबरोबरच व्यवसाय म्हणून या योजनेमार्फत शेतकरी खाद्यतेलाची उत्पादन घेऊन स्वतःची आर्थिक उत्पन्न वाढून समाजामध्ये एक मानाचे स्थान निर्माण करू शकतो .

ऑइल मिल योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाला भेट देऊन ऑइल मिल फिल्टर प्रेस सह या अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये करावयाचा आहे.

ऑइल मिल फिल्टर प्रेस सह या अनुदान योजनेविषयी असणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

सातबारा उतारा

आठ अ उतारा

आधार कार्ड

बँक पासबुक

मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला

वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.




Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण