वन्य प्राणी / जंगली प्राणी हल्ला नुकसान भरपाई

 वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई

वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या मनुष्य हानीसाठी नुकसान भरपाई म्हणून जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

शेतकरी हा शेतीमध्ये शेती करत असताना बराच वेळा जंगली प्राण्यांमुळे त्याच्यावर हल्ला झालेला अथवा मृत झालेला आपण वारंवार बातमी द्वारे पाहत असतो व त्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक नुकसान व कुटुंबाचा प्रमुख गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदन म्हणून शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कुटुंबाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र मध्ये बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तसेच वाघ, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस , कोल्हा, मगर, हत्ती, रान कुत्रे, माकड यांचे देखील मनुष्य वस्तीमध्ये वावर वाढल्यामुळे मनुष्यावर हल्ले झालेले आपण पाहिलेले आहे .

 जंगली वन्य प्राण्यांमुळे केलेल्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनातर्फे नुकसान भरपाई दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .

वन विभागाच्या वतीने वन्यजीव संवर्धन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानामुळे आपल्या महाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या मनुष्यहानीच्या घटना आपल्याला घडताना दिसत आहे .  मनुष्यावर तसेच इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना आपल्याला पाहताना दिसत आहे आणि ह्या घटना आता दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत.

वन्य प्राण्यांमुळे किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय बैल यांचा मृत्यू झाला तर आता 70 हजार रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीने अथवा वनविभाग ह्यांच्या वतीने मिळणार आहेत.

मेंढी, बकरी अथवा शेळी यांचा जर मृत्यू झाल्यास यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 10 हजार रुपये दिले जात होते परंतु आता त्याच्यामध्ये वाढ करून 15 हजार रुपये देण्यात येणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय ,म्हैस ,बैल ,मेंढी ,बकरी व इतर जनावरे जखमी झाल्यास चार हजार रुपये ऐवजी आता पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर एखादी व्यक्ती मृत पावल्यास त्याला शासनातर्फे आता 25 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे .

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत म्हणून 7 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखादा व्यक्ती गंभीर रित्या जखमी झाल्यास त्याला शासनातर्फे आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखादा व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास त्याला वनविभागातर्फे त्या व्यक्तीला औषध उपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार आहे परंतु खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे गरजेचे असल्यास त्याला 50 हजार रुपयापर्यंत प्रति व्यक्ती एवढी मदत मिळणार आहे परंतु शक्यतो त्याचा आर्थिक उपचार हा शासकीय अथवा जिल्हा परिषद रुग्णालयातच करावा हा शासनाचा नियम आहे.

वन्य प्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणारे रकमेपैकी रुपये 10 लाख धनादेशाद्वारे व उर्वरित 10 लाख रुपये पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे व उर्वरित 5 लाख दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी व त्यानंतर दहा वर्षानंतर सर्व रक्कम वारसांना मिळणार आहे.

जर आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीवर वन्य प्राण्यांचा हल्ला झाला तर आपण आपल्या जवळच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित त्वरित कळवावे व संबंधित माहिती अधिकाऱ्याला सांगून पुढील सर्व कागदपत्रे  ह्यांची पूर्तता करून घ्यावी ही विनंती.




Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण