मराठा कर्ज योजना / अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 अण्णासाहेब पाटील योजना 2023 

annasaheb patil yojna

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना

नमस्कार मित्रांनो 

आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याची संपूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी निकष या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 साठी राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो .

जगामध्ये सर्वात जास्त तरुण संख्या ही फक्त भारत देशामध्ये आहे. तरुण वर्गांना कुशल बनवणे, स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणुन त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली.

अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त महाराष्ट्र राज्यातील होतकरू तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवते.

लाभार्थ्याला त्याचा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करणे अथवा महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे.

लाभार्थ्याला जर अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बँकेत गेल्यानंतर तशी माहिती बँकेला देणे बंधनकारक आहे . 

बँकेचे कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाला लाभार्थ्यांनी द्यावयाची आहे . जर अण्णासाहेब पाटील महामंडळा च्या निकषांमध्ये जर लाभार्थी पात्र ठरला तर त्यानंतर त्याच्या कर्जावरील संपूर्ण व्याज हे अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते .

जर लाभार्थ्यांनी कर्ज मंजुरीनंतर कर्जाचे हप्ते भरली नाही तर महामंडळ त्याच्या व्याज्याचा परतावा देत नाही.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा व त्याला लाभार्थ्या चे वय 55 वर्षाच्या खालील असावा.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

तहसीलदार उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

बँकेचे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र

कर्ज घेण्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट

मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला

कास्ट सर्टिफिकेट

व्यवसाय परवाना

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

कर्ज प्रकरणासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महारोजगार या वेब पोर्टलवर प्रथम रजिस्ट्रेशन करून त्याची संपूर्ण माहिती भरावी.

अधिक माहितीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन त्याची संपूर्ण माहिती घ्यावी.

http://www.mahaswayam.gov.in

धन्यवाद.

अशा अनेक योजनेची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

www.newsjunner.com



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण