कृषी यांत्रिकीकरण योजना # शेतकर्यांना मिळणारं 50% अनुदान
कृषी यांत्रिकीकरण योजना 2023
Krushi yantrikikaran yojna
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिळणार 40 ते 50 टक्के अनुदानावरती कृषी यंत्र
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष व अटी या संदर्भात सर्व बाबी जाणून घेणार आहोत.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळी धोरण अमलात आणत असतात . शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हा या धोरणांचा मुख्य उद्देश आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना अमलात आणली आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून शेतकऱ्याला खालील दिलेली सर्व यंत्रे 40 ते 50 टक्के अनुदानावरती मिळणार आहेत त्याची नावे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
ट्रॅक्टर
पावर टेलर
मळणी यंत्र
रिपर यंत्र
नांगर
रोटावेटर
कल्टीवेटर
पेरणी यंत्र
रिजर
इलेक्ट्रिक मोटर पंप
एवढ्या योजना कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणलेले आहेत .
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी प्राधान्य म्हणून अनुसूचित जाती व जमाती, अपंग शेतकरी व महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळते. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महिलांना 30 टक्के तर अपंगांना 3 टक्के जागा आरक्षित असतात याची नोंद लाभार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. म्हणजे लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील महिला वर्गाच्या अथवा कुटुंबात जर अपंग व्यक्ती असेल तर आणि त्यांचे सातबारा उतारा वरती नाव असेल तर त्यांच्या नावाने अर्ज केला तर फायद्याचे ठरेल.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान मिळते .
कृषी यांत्रिकीकरण योजने मधून पावर टिलर साठी 80 ते 85 हजार रुपये अनुदान मिळते.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून बाकी सर्व यंत्रांना 40 ते 50 टक्के अनुदान मिळते याची देखील लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी .
कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सेवा केंद्रमध्ये जाऊन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे .
लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याची निवड ही कृषी विभागाकडून सर्व कागदपत्रांची छाननी केल्यावर लॉटरी पद्धतीने केली जाते जर लाभार्थ्याची निवड झाली तर तशी माहिती कृषी विभागाकडून कळवण्यात येते अथवा लाभार्थीच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे त्याला माहिती भेटते .
कृषी विभागाकडून निवड झाल्यानंतर कृषी यंत्र देखील कृषी विभागाने ठरवलेल्या नोंदणीकृत अथवा अधिकृत दुकानातूनच घेणे बंधनकारक राहील.
कृषी विभागाकडून निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला यंत्र खरेदी करण्यासाठी दुकानदाराला बँकेतर्फे आरटीजीएस करावी लागते व त्या एन्ट्री ची प्रत महाडीबीटी पोर्टलवर यंत्र खरेदी झाल्यानंतर पुन्हा अपलोड करावे लागते .
दुकानदाराकडून यंत्र घेतल्यानंतर कृषी विभागातर्फे त्या यंत्राचे व लाभार्थ्याचे फोटो जिओ टॅग पद्धतीने अपलोड करावी लागतात . व त्या यंत्राची खरेदीचे बिल देखील महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणं गरजेचे आहे याची देखील नोंद लाभार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर व कृषी विभागातर्फे तपासणी झाल्यानंतर अल्प कालावधीतच शासनातर्फे ठरलेले अनुदान हे लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येतात.
यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
सातबारा उतारा
आठ अ उतारा
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
अनुसूचित जाती जमाती दाखला असल्यास
अपंगत्व दाखला असल्यास
कोटेशन बिल
एवढ्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लाभार्थ्याला असते.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाला एक वेळ अवश्य भेट द्यावी व या योजनेविषयी असणारी सर्व माहिती कृषी अधिकारी यांचेकडून जाणून घ्यावी.
धन्यवाद
अशा अनेक वेगवेगळ्या सरकारी योजना पाण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या .
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment