रेशीम उद्योग / reshim udyog
रेशीम उद्योग रेशीम उद्योग पोकरा योजना महाराष्ट्र रेशीम उद्योग माहिती मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रेशीम उद्योग व्यवसायाबद्दल असणारी संपूर्ण माहिती, त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. रेशीम उद्योग हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याहीपेक्षा शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळेमध्ये महिनाभरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या पाणी निचऱ्याच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून उत्पादन घेता येते व पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन घेता येते. एकदा तुती लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत तूती जगतात त्यामुळे लागवडीचा वारंवार येणारा खर्च देखील वाचतो. तुती साठी जास्त पाण्याची देखील गरज नसते त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये तुतीचे उत्पादन घेता येते. रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भा...