अटल पेंशन योजना
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना 2023
भारत सरकार हे नेहमीच गरिबांच्या वृद्ध काळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षितेबाबत चिंतीत आहे व त्या लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारत सरकार लक्ष केंद्रित करत आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील दीर्घायुष्याच्या जोखीमिश्चंद्राखण करण्यासाठी व त्या लोकांना सेवानिवृत्तीसाठी संस्कृतीने बचत करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारने असंघटित कामगारांसाठी स्वावलंबन योजना सुरू केली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत वयाच्या साठाव्या वर्षी नंतर पेन्शन देण्यात येणार आहे.
भारत सरकारने 2015 16 च्या अर्थसंकल्पात विशेषता गरीब आणि वंचित लोकांसाठी विमा आणि पेन्शन क्षेत्रात सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे . म्हणूनच त्यानंतर भारत सरकारकडून अटल पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला किमान 1000 रुपये ते रुपये 5000 प्रति महिना एवढी पेन्शन मिळणार आहे .
अटल पेन्शन योजनेमध्ये सामील होण्यासाठी किमान वय18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे.
अटल पेन्शन योजनेचे अंमलबजावणी भारत सरकारकडून एक जून 2015 पासून लागू करण्यात आली आहे.
अटल पेन्शन योजना ही मध्यमवर्गीयांसाठी व गरिबांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, पेन्शन योजनेमुळे प्रत्येक जण आपले स्वतःचे व कुटुंबाचे भविष्य उज्वल करू शकतो सुरक्षित करू शकतो त्यामुळे अटल पेन्शन योजनेचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे.
अटल पेन्शन योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट हे हा असंघटित क्षेत्रातील कामगारांना नियमित निवृत्तीवेतन देणे हे आहे व या कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
अटल पेन्शन योजनेमध्ये पेन्शनची रक्कम ही 1000 रुपये ते 5000 रुपये प्रति महिना एवढी असणार आहे .
अटल पेन्शन योजनेसाठी लाभार्थ्याला पेन्शन योजनेसाठी योगदान म्हणून एक रक्कम ठरवण्यात आलेली आहे या योगदानाद्वारे लाभार्थ्याच्या बचत खात्यातून दर महिन्याला रुपये 42 प्रति महिना आणि कमाल रुपये 210 प्रति महिना अटल पेन्शन योजनेमध्ये जमा केली जाणार आहे.
अटल पेन्शन योजनेमध्ये लाभार्थ्याचा पेन्शन कालावधी साठ वर्षे वयापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे.
अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचा बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे . व लाभार्थ्यांनी किमान वीस वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेत योगदान देणे आवश्यक आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन ग्राहकाचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन योजना चालू होणार आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकाचा मृत्यू झाल्यास ग्राहकाचा जोडीदार ही योजना चालू ठेवू शकतो आणि पेन्शनची रक्कम मिळू शकतो जर जोडीदार योजना सुरू ठेवू इच्छित नसेल तर जमा झालेला निधी सदस्याच्या नॉमिनीला परत केला जाईल.
अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट फोटो
अटल पेन्शन योजनेचा अर्ज
वरील दिलेले एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
अटल पेन्शन योजनेचा जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सरकारी बँक अथवा पोस्ट ऑफिस यांना भेट देऊन याची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
धन्यवाद.
अशा सर्व सरकारी योजना जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्यावी.
Comments
Post a Comment