रेशीम उद्योग / reshim udyog

 रेशीम उद्योग

रेशीम उद्योग पोकरा योजना महाराष्ट्र

रेशीम उद्योग माहिती मराठी

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये रेशीम उद्योग व्यवसायाबद्दल असणारी संपूर्ण माहिती, त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.

रेशीम उद्योग हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याहीपेक्षा शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळेमध्ये महिनाभरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या पाणी निचऱ्याच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून उत्पादन घेता येते व पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन घेता येते. एकदा तुती लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत तूती जगतात त्यामुळे लागवडीचा वारंवार येणारा खर्च देखील वाचतो. तुती साठी जास्त पाण्याची देखील गरज नसते त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये तुतीचे उत्पादन घेता येते.

रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतो . हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने रेशीम उद्योगाला प्रचार आणि प्रोत्साहन देण्यासाठी या उद्योगाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती होण्यासाठी रेशीम उद्योगाला अनुदान देण्यात आलेले आहे त्यामुळे जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे.

निसर्गातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे तसेच अनिश्चित असलेला बाजार भाव यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे . परंतु रेशीम उद्योगा द्वारे दर महिन्याला शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते व रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड केल्यानंतर या वर्षापर्यंत लागवडीचा खर्च देखील येत नाही त्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकरी हा आपले आर्थिक उत्पन्न वाढू शकतो.


रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शाश्वत स्त्रोत निर्माण करणे , त्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण रेशीम तंत्रज्ञान आणि व रेशीम उद्योगा द्वारे ग्रामीण भागातील राहणाऱ्या गरीब शेतकरी, आदिवासी, व इतर घटकातील लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .


रेशीम उद्योगासाठी लाभार्थी शेतकऱ्याची पात्रता व निकष

रेशीम उद्योगासाठी लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , आदिवासी, दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे इतर पात्र शेतकरी हे या योजनेचे अंतर्गत प्राधान्य क्रमानुसार पात्र आहेत .


रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे .

रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासंबंधीत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

रेशीम उद्योगासाठी लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळवला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

रेशम उद्योग सुरू केल्यानंतर कमीत कमी तीन वर्षे हा उद्योग करणे आवश्यक आहे.


रेशीम उद्योगासाठी सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 % अनुदान व अनुसूचित जाती जमाती करता 90% अनुदान देण्यात येणार आहे.




Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna