आयुष्यमान भारत योजना / aayushyman bharat yojna

 

आयुष्यमान भारत  योजना 2023

आयुष्यमान भारत योजना / महात्मा फुले जन आरोग्य योजना 

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजना अथवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी सर्व माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत .

महाराष्ट्र सरकारचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 जुलै 2012 पासून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनांक 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णय खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे

1 सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत     आरोग्य  संरक्षण प्रती कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लक्ष एवढे आहे तर     महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण     प्रति  कुटुंब प्रति वर्ष 1. 5 लक्ष एवढे आहे.

2. सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन     आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रुपये 2.5 लक्ष   एवढी आहे ती आता रुपये 4.50 लक्ष एवढी करण्यात येत आहे .

3 सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 व   प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत . यापैकी   मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येत आहे . तर 328   मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे .   प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संकेत 147 ने   वाढ होऊन उपचार संख्या 1356 एवढी करण्यात येत आहे व   1356 एवढेच उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य   योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे .

4 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान   भारत  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये   अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1000 एवढी आहे. सदर योजना या   आधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमालगच्या   महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात 140 व सीमेलगतच्या कर्नाटक   राज्यातील चार जिल्ह्यात दहा अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत   करण्याचा निर्णय झाला आहे त्या व्यतिरिक्त 200 रुग्णालय   अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता   अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1350 होईल .

5 आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील   सर्व शिधापत्रिका धारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्र धारक   कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.

6 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या दिनांक    14 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदी मध्ये     सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचाराची संख्या 74   वरून  184 अशी वाढविण्यात येत आहे . तसेच उपचाराची खर्च   मर्यादा 30000 ऐवजी प्रति रुग्ण प्रति अपघात रुपये एक लक्ष   एवढी करण्यात येत आहे योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव   फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येत आहे .

7 सदर योजना संपूर्णपणे हमी तत्वावर राबवण्यात येईल म्हणजे   उपचाराचा जो खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटी थेट   अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करेल.

8 शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित   रुग्णालयांकडेच ठेवण्यास परवानगी देण्यात येईल .

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे .

या योजनेमार्फत गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल , रोजंदारी कामगार, शेतकरी लोक ज्यांना उपचारासाठी कर्जबाजारी व्हावे लागते अशा लोकांना उपचारासाठी कोणावरही अवलंबून न राहता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मार्फत सर्व उपचार करण्यात येणार आहे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ज्यांचे रेशनिंग कार्ड हे पिवळे अथवा केशरी रंगाचे आहे ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत लाभार्थ्याला संपूर्ण वैद्यकीय उपचार , प्रवास खर्च , भोजन देण्याची तरतूद केलेली आहे.

या योजनेसाठी शासकीय , निमशासकीय अथवा खाजगी हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आला आहे ... आपण अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन याची माहिती घेऊ शकता .

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत खालील प्रमाणे उपचार असणार आहे.

बालरोग शस्त्रक्रिया , कर्करोग शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, श्री रोग व प्रसुती शास्त्र, कान नाक घसा शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, मज्जातंतू विकृती शस्त्रक्रिया , प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया , संसर्गजन्य रोग, हृदयरोग, जळीत , न्यूरोलॉजी, नेफरोलॉजी, रोमॅॅटो लॉजी, मेडिकल गॅस्ट्रो इंट्रोलॉजी, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, जोखीम देखभाल , जनरल मेडिसिन, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, पोट व जठर शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी कर्करोग

असे अनेक नाना प्रकारचे 971 उपचार या योजनेत समाविष्ट करण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत लाभार्थ्याला वैद्यकीय उपचार हे निशुल्क असणार आहेत लाभार्थ्याला जेवण व एक वेळचा प्रवास देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

या योजनेमार्फत लाभार्थ्याच्या कुटुंबाला दरवर्षी दोन लाख रुपये व गंभीर आजाराला तीन लाख रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे.

या योजनेसाठी लाभार्थी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र असणार आहे तो आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती देऊन आपल्या आजाराची ऑनलाईन नोंद करून अथवा तो आजार या योजनेत समाविष्ट असेल तर त्यावर विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने आपलाय देखील करणार आहे .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे

आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशनिंग कार्ड

उत्पन्नाचा दाखला

पासपोर्ट फोटो

सरकारी डॉक्टरने अथवा या योजनेत पात्र असलेल्या हॉस्पिटल ने दिलेले आजाराचे प्रमाणपत्र

एवढ्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लाभार्थ्याला असते .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जर कोणालाही लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन याची संपूर्ण माहिती घ्यावी.




Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna