Lek ladki yojna 2023 / लेक लाडकी योजना 2023

 लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना 2023

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये लेक लाडकी योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर एक लाख एक हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे त्यामुळे आता मुलगी जन्माला नंतर त्या कुटुंबाला मुलींच्या भवितव्याची चिंता राहणार नाही .

ह्या योजनेचे नाव लेक लाडकी योजना या नावाने शासनातर्फे मंजुरी देण्यात आली आहे .

लेक लाडकी योजनेची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी सांगताना दिली व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा ही या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे .

महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या किंवा ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

2023 च्या मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पात

महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली याची बैठक झाली व त्याची तूर्तास मंजुरीही देण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा गरिब कुटुंबातील मुलींना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे त्या कुटुंबातील मुलींना मुलगी जन्मल्यापासून ती वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने याची रक्कम देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मुलींचा जन्माचा दर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .

लेक लाडकी योजनेचा अंमलबजावणी खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे

मुलगी जन्माला आल्यावर  पाच हजार रुपये

मुलगी शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर सहा हजार रुपये

सहावी वर्गात जाण्यासाठी सात हजार रुपये

अकरावी ला जाण्यासाठी आठ हजार रुपये

आणि मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 हजार रुपये दिले जाणार आहेत .


लेक लाडकी योजनेचा फायदा पिवळा किंवा केशरी कार्डधारक असलेल्या कुटुंबांनाच घेता येणार आहे.


लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे

एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना च फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे .

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.

मुलींच्या शिक्षणास चालना देणे.

मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह टाळणे .

मुलींचे कुपोषण कमी करणे व शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे .


लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे .

पिवळे किंवा केशरी रंगाची शिधापत्रक

मुलीच्या पालकांचे आधार कार्ड

आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो

अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

आधार कार्ड

पॅन कार्ड

तहसीलदार उत्पन्न दाखला

मोबाईल नंबर आधार शि लिंक असलेला

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाण पत्र

बँक पासबुक

ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील . कुटुंबात जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांच्यासाठी देखील लागू करण्यात आलेला आहे . पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्नीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे व सदर कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे एक लक्ष लाखापेक्षा जास्त नसावे.

म्हणजेच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत शासनाच्या वतीने तिला एक लाख एक हजार रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे .


अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा महा-ई-सेवा केंद्र शी संपर्क साधावा व संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna