Manrega job card मनरेगा योजना 2023
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2023 केंद्र सरकार योजना 2023 मनरेगा योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये मनरेगा योजना विषयी अथवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी असणारी संपूर्ण माहिती, लाभार्थ्याची वय ,त्याच्या अटी याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. भारत देशामध्ये आजही ग्रामीण स्तरावर अनेक कुटुंबांना रोजगारासाठी नेहमीच भटकंती करावी लागते त्यामुळे त्यांना आर्थिक बाबींचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसतो. ग्रामीण स्तरावरील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मनरेगा योजना अमलात आणली. मनरेगा योजना म्हणजे ग्रामीण भागातील शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील यांना आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांसाठी मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कुटुंबांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मनरेगा योजना ही शेतमजुरांना किंवा आर्थिक दुर्बल घटकांना अथवा महिला आणि पंचायत राज संस्थांना आर्थिक बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकार ही ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी प्रति कुटुंब श...