विधवा महिला पेन्शन योजना vidhva mahila penshan yojna व त्यासाठी कुठे अर्ज करायचा ह्याची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना Vidhva mahila penshan yojna महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना त्याची नोंदणी आणि पात्रता याची माहिती खालील प्रमाणे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेची आपण माहिती पाहणार आहोत या योजनेची नेमकी उद्दिष्टे व लाभ कोणते पात्रता व आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब विधवा महिला यांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे व स्वावलंबि करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून गरीब विधवा महिलांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करण्याची गरज लागणार नाही त्यामुळे म्हातारपणामध्ये त्यांचे जीवन सुखाचे व समृद्धीचे असेल ह्या योजनेमुुळे ळर्व विधवा महिलांना दर महिन्याला शासनातर्फे त्यांच्या बँकेच्या खात्यात सहाशे रुपये जमा होणार आहे ही रक्कम आता नव्याने वाढली असून हजार रुपये करण्यात आली आहे. ज्या महिलेचा पती वारला आहे किंवा पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला कोणतेही आर्थिक मदत को...