विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna
शेतीसाठी विहीर अनुदान योजना Viheer yojna ह्या योजनेसाठी शासनाकडून मिळवा 4 लाख रुपये अनुदान राज्यातील बरेचसे शेतकरी हे पैश्याच्या अभावी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी व पाण्याची सुविधा करण्यासाठी असमर्थ आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून जर शेतात विहीर झाली तर शेतकरी शेतीला पुरेसे पाणी देवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न होवू शकतो . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान देत जाणार आहे. भूजलाच्या सर्वेनुसार राज्यात अजून 4 लाख विहीर खोदणे शक्य आहे. ह्या विहिरी लवकरात लवकर खोदल्यास आपला शेतकरी राजा सुखी व आनंदी,समाधानी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. शेतकरी वर्गाचे दारिद्र्य घालवण्यासाठी व मागेल त्याला विहीर ( निकषानुसार ) ह्यासाठी ह्या योजनेचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. # लाभधारकाची निवड या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे...